Police constable beats local residents | पोलिस शिपायाने केली स्थानिक रहिवाशांना मारहाण 
पोलिस शिपायाने केली स्थानिक रहिवाशांना मारहाण 

पुणे - पुणे पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस शिपायाने आपला घराशेजारील परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.  श्रेसय विनोद साळवी असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांच्याविरोधात चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे. 

पोलिस शिपाई श्रेयस विनोद साळवी हा स्थानिक रहिवाशांवर दगडफेक करत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान,  नागरिकांना मारहाण करणारा साळवी हा मानसिक रुग्ण असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. तसेच यापूर्वीही त्याने मारहाणीसारखे प्रकार केले होते. तसेच त्याला अटक करून नंतर सुटका करण्यात आली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

Web Title: Police constable beats local residents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.