Police bursted prostitution racket by becoming a customer | ग्राहक बनून पोलिसांनी वेश्याव्यवसायाचे रॅकेट केले उध्वस्त
ग्राहक बनून पोलिसांनी वेश्याव्यवसायाचे रॅकेट केले उध्वस्त

मुंबई - सोशल मिडिया, वेबसाईट तसेच जाहिरातीद्वारे मोबाईल क्रमांक देऊन वेश्याव्यवसाय करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश गुन्हे शाखेच्या कक्ष ७च्या पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी एका हॉटेलच्या कॅशिअर मनोज पुजारी याला अटक केली आहे.

सोशल मिडिया, वेबसाईट तसेच जाहिरातीद्वारे मोबाईल क्रमांक देऊन पवई येथील एका हॉटेलमध्ये वेश्याकामासाठी महिला पुरवल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या प्रकरणाची खत्री करून एका बनावट ग्राहकाला तयार केले व त्याला पवई येथील आरोपी एजंट याने फोन करून निश्चित केलेल्या हॉटेल रिलॅक्स इन रेसिडन्सी येथे पाठवले. डमी ग्राहक या हॉटेलच्या रूममध्ये पोहोचताच एजंटने पाठवलेल्या तीन महिला रूममध्ये आल्या. त्या महिलांना ठरलेली रक्कम व कॅशिअरला रूमचे भाडे दिल्यानंतर सापळा

लावलेल्या पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. यातील पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून या प्रकरणी पोलिसांनी हॉटेलच्या कॅशियरला अटक केली आहे. यातील आरोपी एजंट फरारी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: Police bursted prostitution racket by becoming a customer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.