सराईत गुन्हेगाराकडून देशी कट्टा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 14:53 IST2018-07-21T14:51:41+5:302018-07-21T14:53:13+5:30

देशी बनावटीचे पिस्तुल बाळगणाऱ्याला पाेलिसांनी सापळा रचून पकडले.

police arrest gun holder in marketyard | सराईत गुन्हेगाराकडून देशी कट्टा जप्त

सराईत गुन्हेगाराकडून देशी कट्टा जप्त

पुणे : देशी बनावटीचे पिस्तुल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला खंडणी विरोधी पथकाने मार्केटयार्ड भागात पकडले. 
स्वप्नील अंकुश मिसाळ (वय २१, रा. सांडभोर वस्ती, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, मिसाळ सराईत गुंड आहे. त्याच्याविरूद्ध यापूर्वी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गंभीर  स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. मार्केटयार्ड भागात तो थांबला असून त्याच्याकडे पिस्तुल असल्याची माहिती पोलीस शिपाई शिव बोले यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल आणि एक काडतुस जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, उपनिरीक्षक राहुल घुगे, संतोष मते, एकनाथ कंधारे, रमेश गरूड, उदय काळभोर, महेश कदम, मनोज शिंदे यांनी ही कारवाई केली. 

Web Title: police arrest gun holder in marketyard