राजेश भोस्तेकर
अलिबाग - मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को ग्राउंड वर झालेल्या म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान दोन युवकांचा ड्रग्सच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाला होता. यानंतर आयुष विकी साहित्य हा उल्हासनगर मधील आरोपी फरार झाला होता. रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदरावडे यांनी केलेल्या नाकाबंदीमध्ये गोवा येथे कारने जाताना आयुष साहित्य याच्यावर झडप घालून पकडण्यात आले.
गोरेगाव येथील म्युझिक कन्सर्टच्या नावाखाली आयोजित रेव पार्टीमध्ये ड्रग चे अति सेवन करणाऱ्या दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी वनराई पोलिस ठाणे मुंबई शहर येथे भारतीय न्याय संहिता आणि एनडीपीएस कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील फरार आरोपी आयुष विकी साहित्य, वय -२४ रा- उल्हासनगर हा मुंबई गोवा महामार्गाने गोवा येथे पळून जात असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी कळविण्यात आल्याने पोलादपूर पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्तपणे पोलादपूर येथे नाकाबंदी आणि सापळा रचून ताब्यात घेण्यात आले आहे.
आयुष साहित्य याने "एक्सटसी" या नावाचे अमली पदार्थ सदर म्युझिक कॉन्सर्ट मध्ये वितरित केल्याचे निष्पन्न झाले आहे .आयुष साहित्य या आरोपीस वनराई पोलिस ठाणेच्या ताब्यात देण्यात आले आहे. फरार झालेला आयुष साहित्य या आरोपीस पकडण्याची कारवाई रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद गावडे आणि सहकारी यांच्याकडून करण्यात आली आहे.
Web Summary : A fugitive wanted in connection with the Goregaon music concert drug deaths was arrested in Poladpur while fleeing to Goa. Ayush Sahitya distributed ecstasy at the concert. He is now in police custody.
Web Summary : गोरेगांव संगीत कार्यक्रम में ड्रग्स से हुई मौतों के मामले में वांछित भगोड़े को गोवा भागते समय पोलादपुर में गिरफ्तार किया गया। आयुष साहित्य ने संगीत कार्यक्रम में एक्स्टसी वितरित की थी। वह अब पुलिस हिरासत में है।