कॉलगर्ल असल्याचं सांगत पत्नी आणि मेहुणीचे फोटो केले व्हायरल, मोबाइल नंबरही केला शेअर आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 02:01 PM2021-06-12T14:01:31+5:302021-06-12T14:01:50+5:30

पत्नीचा आरोप आहे की, तिच्या पतीने तिचे आणि तिच्या लहान बहिणीचे फोटो त्या कॉलगर्ल असल्याचं सांगत सोशल मीडियावर शेअर केले.

UP : Picture of wife and sister in law has gone viral as a call girl by husband in Meerut | कॉलगर्ल असल्याचं सांगत पत्नी आणि मेहुणीचे फोटो केले व्हायरल, मोबाइल नंबरही केला शेअर आणि मग....

कॉलगर्ल असल्याचं सांगत पत्नी आणि मेहुणीचे फोटो केले व्हायरल, मोबाइल नंबरही केला शेअर आणि मग....

Next

उत्तर प्रदेशमधील एका व्यक्तीवर आरोप आहे की, कौटुंबीक वादानंतर त्याने त्याची पत्नी आणि मेहुणी कॉलगर्ल असल्याचं सांगितलं. त्या कॉलगर्ल असल्याचं सांगत त्यांचे फोटो त्याने सोशल मीडिया आणि वेगवेगळ्या ग्रुपमध्ये शेअऱ केलेत. मेरठच्या मुंडालीमध्ये एका महिलेने तक्रार दिली असून पतीविरोधात कारवाईची मागणी केली आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, असा आरोप आहे की, लग्न झाल्यापासूनच या व्यक्तीचा पत्नीसोबत वाद होता. त्यामुळे ऑक्टोबर २०१९ पासून महिला आपल्या वडिलांच्या घरी राहत होती. महिला आणि तिच्या परिवाराचा आरोप आहे की, पती हुंड्याची मागणी करत होता आणि मारहाणही करत होता. ज्याला वैतागून ती वडिलांकडे रहायला गेली होती. (हे पण वाचा : धक्कादायक! वडील आणि सासूच्या लव्हस्टोरीत व्हिलन बनला मुलगा, दोघांनी लग्न केलं आणि मग...)

पत्नीचा आरोप आहे की, तिच्या पतीने तिचे आणि तिच्या लहान बहिणीचे फोटो त्या कॉलगर्ल असल्याचं सांगत सोशल मीडियावर शेअर केले. इतकंच नाही तर दोघींचे मोबाइल नंबरही त्याने  सोशल मीडियावर फोटोसोबत शेअऱ केले. महिला म्हणाली की, तिच्या पतीवर काहीच कारवाई होत नाहीये. आरोपी बऱ्याच महिन्यांपासून त्रास देत आहे. तो चार महिन्यांपासून असंच करत आहे. महिलांना वेगवेगळ्या नंबरवरून लोकांचे फोन येतात. त्यामुळे त्या हैराण झाल्या आहेत.

याप्रकरणी सीओ किठौर बृजेश सिंह म्हणाले की, अजराडा गावातील सोनू नावाच्या व्यक्तीचा पत्नीसोबत वाद सुरू आहे. त्याने पत्नी आणि पत्नीच्या परिवाराविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. ज्याची चौकशी सुरू आहे. गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल. सध्या चौकशी सुरू आहे. (हे पण वाचा : नवरा-बायको एकत्र बसून पित होते दारू, महिलेचा फोन वाजला आणि घडलं असं काही...)

अशाप्रकारची समोर आलेली ही पहिलीच घटना नाही. याआधीही अशा घटना बघायला मिळाल्या ज्यात पती आणि पत्नीने एकमेकांना ब्लॅकमेल केलं. काही दिवसांपूर्वी पंजाबच्या पटियालामध्ये आपल्या आई-वडिलांच्या घरी राहत असलेल्या महिलेने पतीविरोधात पोलिसात तक्रार दिली होती. महिला म्हणाली होती की, माझ्यासोबत पतीने दुसरं लग्न केलं होतं. सासरी लोक चांगले वागत नसल्याने ती बऱ्याच महिन्यांपासून माहेरीच राहते. 

महिला म्हणाली होती की, पतीला हे मान्य नव्हतं. आरोपानुसार, पतीने पत्नीला बदनाम करण्यासाठी तिच्या नावाने एक फेसबुक अकाउंट सुरू केलं. त्यानंतर पत्नीच्या माहेरी आजूबाजूला राहत असलेल्या लोकांना फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवली आणि त्या प्रोफाइलवर आक्षेपार्ह फोटो शेअर केले होते.
 

Web Title: UP : Picture of wife and sister in law has gone viral as a call girl by husband in Meerut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app