नवरा-बायको एकत्र बसून पित होते दारू, महिलेचा फोन वाजला आणि घडलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 11:59 AM2021-06-11T11:59:25+5:302021-06-11T12:31:54+5:30

विकास उर्फ विक्कीचं लग्न गेल्यावर्षी दिल्लीतील नेहासोबत झालं होतं. सांगितलं जात आहे की, दोघेही रात्री उशीरा दारू पित बसले होते.

उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये एका नशेत असलेल्या पतीने त्याच्या पत्नीचा गळा धारदार शस्त्राने कापला. जेव्हा हा हल्ला पतीने केला तेव्हा महिलाही नशेत होती. घटनेनंतर तिला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने हे कृत्य केलं. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

मेरठच्या ब्रम्हपुरी भागातील ही घटना आहे. विकास उर्फ विक्कीचं लग्न गेल्यावर्षी दिल्लीतील नेहासोबत झालं होतं. सांगितलं जात आहे की, दोघेही रात्री उशीरा दारू पित बसले होते. यादरम्यान नेहाच्या फोनवर एक कॉल आला. यावरूनच नेहा आणि विकासमध्ये वाद झाला.

वाद इतका वाढला की, नशेत असलेल्या विकासने आधी तिला मारहाण केली आणि नंतर भाजी चिरण्याच्या चाकूने तिच्या गळ्यावर वार केला.

बराच वेळी ती रक्ताच्या थारोळ्यात घराच्या छतावर पडली होती. शेजारच्या काही लोकांनी याची माहिती विकासच्या आईला दिली. ती घटनास्थळी पोहोचली आणि तिने लोकांच्या मदतीने नेहाला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

पोलिसांनी सांगितलं की, आरोपी पतीला ताब्यात घेतलं आहे. पती-पत्नी दोघेही सोबत दारू पित होते. यादरम्यान त्यांच्यात वाद झाला आणि पतीने चाकूने पत्नीवर हल्ला केला. पुढील चौकशी सुरू आहे.

आरोपी पतीच्या आईने सांगितलं की, ती कामावर गेली होती आणी जेव्हा परतली तेव्हा दोघांच्या भांडणाबाबत समजलं. दोघांनीही दारू प्यायली होती. मी सूनेला माझ्यासोबत खाली चलण्यास सांगितलं. पण ती काही आली नाही.

आरोपीची आई पुढे म्हणाली की, सूनेला कुणाचातरी फोन आला होता. ज्यानंतर मुलगा संतापला आणि त्याने भाजी चिरण्याच्या चाकूने तिच्या गळ्यावर वार केला.

त्यांनी सांगितलं की, लॉकडाऊन असताना मी पोलिसांकडून परवानगी घेऊन दोघांचं लग्न लावून दिलं होतं. सूनेने भाड्याने वेगळी रूमही घेतली होती.

दोघेही वरच्या घरात राहत होते आणि मी पतीसोबत खाली राहत होती. मुलाने वरच्या खोलीला लॉक लावून ठेवलं होतं. मी ते तोडलं आणि काही लोकांना बोलवून तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.