धक्कादायक! वडील आणि सासूच्या लव्हस्टोरीत व्हिलन बनला मुलगा, दोघांनी लग्न केलं आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 11:29 AM2021-06-12T11:29:01+5:302021-06-12T11:31:24+5:30

सोमवारी भवानी आपल्या पत्नीसोबत मुलाला भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेला होता. यावेळी मुलगा ललन मांझी रागात दोघांनाही घरातून जाण्यास सांगितले होते.

Bihar : Jamui angry man killed father and mother in law after they got married | धक्कादायक! वडील आणि सासूच्या लव्हस्टोरीत व्हिलन बनला मुलगा, दोघांनी लग्न केलं आणि मग...

धक्कादायक! वडील आणि सासूच्या लव्हस्टोरीत व्हिलन बनला मुलगा, दोघांनी लग्न केलं आणि मग...

Next

बिहारच्या जमुईमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे मुलाच्या वडिलांचं सासूसोबतचं प्रेम प्रकरण इतकं वाढलं होतं की, वैतागून मुलाने वडील आणि सासूची हत्या केली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. 

मीडिया रिपोर्टनुसार, आरोपी ललन मांझीचं त्याच्या वडिलांसोबत अजिबात पटत नव्हतं. कारण त्याचे वडील भवानी मांझी आणि त्याच्या सासूने लग्न करून सोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. ३ वर्षाआधी दोघांनी लग्न केलं होतं आणि ते कानपूर राहण्यासाठी गेले होते. 

कानपूरमध्ये ललन मांझीची सासू आणि त्याचे वडील विटाच्या भट्टीवर काम करत होते. सोमवारी भवानी आपल्या पत्नीसोबत मुलाला भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेला होता. यावेळी मुलगा ललन मांझी पासवान रागात दोघांनाही घरातून जाण्यास सांगितले होते. पण ते दोघे गेले नाही. याच रागात मुलाने सासू आणि वडिलांना बेदम मारहाण केली. (हे पण वाचा : मुलगा होत नाही आणि दुसऱ्या लग्नाला विरोध केल्याने छळ; दीड वर्षाच्या मुलीसह विवाहितेची आत्महत्या)

 मारझोड केल्यावरही दोघे घरातून गेले नाहीत. त्यामुळे नाराज मुलाने सायंकाळी दोघांचीही हत्या केली. दोघांचे मृतदेह त्याने एका ठिकाणी नेऊन पुरले. ३ दिवसांनी जेव्हा त्या ठिकाणाहून दुर्गंधी येऊ लागली तेव्हा लोकांनी याची सूचना पोलिसांना दिली. (हे पण वाचा : काकांचा सूड उगवला पुतण्यावर; अल्पवयीन मुलाचे अपहरण करून हत्या करणारा गजाआड )

गावातील लोकांच्या सांगण्यावरून पोलिसांनी जेसीबीने त्या ठिकाणी खोदलं तर मृतदेह पाहून सगळे हैराण झाले. हत्येनंतर आरोपी ललन पासवान फरार आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. तसेच आरोपीचा शोधही घेत आहेत.
 

Web Title: Bihar : Jamui angry man killed father and mother in law after they got married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app