किळसवाणे! विकृताने रेल्वे पुलावर एकट्या तरुणीला गाठले; चुंबन घेतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 13:44 IST2020-02-06T13:41:37+5:302020-02-06T13:44:05+5:30

हा किळसवाणा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

The pervert reaches a lonely young woman on a railway bridge and Kissed | किळसवाणे! विकृताने रेल्वे पुलावर एकट्या तरुणीला गाठले; चुंबन घेतले

किळसवाणे! विकृताने रेल्वे पुलावर एकट्या तरुणीला गाठले; चुंबन घेतले

ठळक मुद्दे ही घटना २६ जानेवारीला दुपारी घडली आहे. माटुंगा स्थानकातील पुलावर एका विकृताने मुलीसोबत चुंबन घेऊन छेडछाड केली.  विकृताला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबई : माटुंगा रेल्वे स्थानकाच्या पुलावर अतिशय किळसवाणा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे मुंबईतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कारण, हिंगणघाट आणि औरंगाबादेतील सिल्लोडमधील जळीतकांडाच्या घटना ताज्या असतानाच आता माटुंगा रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे. माटुंगा स्थानकातील पुलावर एका विकृताने मुलीसोबत चुंबन घेऊन छेडछाड केली. हा किळसवाणा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ही घटना २६ जानेवारीला दुपारी घडली आहे. 



पीडित तरुणी माटुंगा रेल्वे स्थानकाच्या पुलावरुन जात असताना एका अज्ञात विकृत तिच्या पाठी मागून येऊन तिचे चुंबन घेतले आणि तिथून पळ काढला. घाबरलेली ती मुलगी तिथून निघून गेली. दरम्यान सीसीटीव्हीद्वारे घटना उघड झाल्यानंतर या विकृताला मोबाईल चोरीच्या गुन्ह्या रेल्वे पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर जामिनावर सुटका देखील करण्यात आली. मात्र, रेल्वे पोलिसांकडे पीडित मुलीने तोंडी तक्रार दाखल केली असून  आरोपीला या आरोपात बेड्या ठोकल्या गेल्या नाहीत असं रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले. रेल्वे स्थानकात चोरांसह मनोविकृतांकडून विनयभंगाच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत.  


 

Web Title: The pervert reaches a lonely young woman on a railway bridge and Kissed