भिवंडीतील खोणी येथे इमारतीची गॅलरी कोसळून एक पादचारी ठार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 20:38 IST2022-01-04T20:35:54+5:302022-01-04T20:38:18+5:30

A pedestrian was killed : खाडीपार येथे दोन मजली इमारत असून त्याच्या तळमजल्यावर एक हॉटेल आहे, तर त्याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावर हॉटेल मधील कामगार राहत असून मंगळवारी दुपारच्या सुमारास या इमारतीच्या पहिल्या मजल्याच्या गॅलरीचा रस्त्याच्या बाजूने असलेला सज्जा अचानक कोसळला.

A pedestrian was killed when the gallery of a building collapsed at Khoni in Bhiwandi | भिवंडीतील खोणी येथे इमारतीची गॅलरी कोसळून एक पादचारी ठार 

भिवंडीतील खोणी येथे इमारतीची गॅलरी कोसळून एक पादचारी ठार 

नितिन पंडीत

भिवंडीभिवंडी शहरा नजीक असलेल्या खोणी ग्रामपंचायत हद्दीतील खाडीपार येथील एका इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळून झालेल्या अपघातात एका भिक्षेकरी पादचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी घडली आहे.

खाडीपार येथे दोन मजली इमारत असून त्याच्या तळमजल्यावर एक हॉटेल आहे, तर त्याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावर हॉटेल मधील कामगार राहत असून मंगळवारी दुपारच्या सुमारास या इमारतीच्या पहिल्या मजल्याच्या गॅलरीचा रस्त्याच्या बाजूने असलेला सज्जा अचानक कोसळला. त्याच सुमारास मूळ जव्हार येथील असलेला परंतु भिक्षा मागून चरितार्थ चालविण्यासाठी येथील आदिवासी पाड्यावर राहत असलेला शीडा दादू पढेर वय ७२ हा वृद्ध भिक्षेकरी त्याच सुमारास त्या ठिकाणाहुन जात असताना त्याच्या डोक्यावर गॅलरीचा ढिगारा पडल्याने वृद्ध भिकाऱ्याचा रक्तस्त्राव झाल्याने जागेवरच गतप्राण झाला. या घटने नंतर स्थानिक निजामपुरा पोलीस घटनास्थळी दाखल होत त्यांनी हॉटेल इमारत मालका विरोधात कारवाई सुरू केली आहे.

Web Title: A pedestrian was killed when the gallery of a building collapsed at Khoni in Bhiwandi