Patna Firing Latest video: एका नामांकित रुग्णालयात पाच आरोपी येतात. आयसीयू रुमच्या बाहेर आल्यानंतर रिव्हॉल्वर काढतात... रुममध्ये घुसून अंदाधूंद गोळीबार करत हत्या करतात आणि लगेच फरार होतात. रुग्णालयात असलेल्या एका व्यक्तीची आरोपी ६४ सेकंदात हत्या करतात. ही घटना घडली आहे बिहारची राजधानी पाटणामध्ये. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून, एखाद्या सिनेमातील दृश्याप्रमाणेच हे सगळे घडले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये हत्यांची मालिकाच सुरू आहे. या हत्यांवर चिंता व्यक्त होत असतानाच आता राजधानी पाटण्यात गुरुवारी सकाळी रिव्हॉल्वरसह आलेल्या गुंडांच्या टोळीने एकाची हत्या केली. पाटणातील पारस रुग्णालयात ही घटना घडली.
६४ सेकंदात हत्या करून फरार
पारस रुग्णालयात घडलेल्या हत्याकांडाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पाच आरोपी आयसीयू कक्षाच्या दिशेने चालत येतात. खोली क्रमांक २०९ च्या बाहेर आल्यानंतर सगळे आपापल्या रिल्व्हॉल्वर काढतात. त्यानंतर पहिला आरोपी दरवाजा उघडून आत जातो.
वाचा >>माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
पहिला आरोपी खोलीत गेल्यानंतर इतर आरोपी त्याच्या पाठोपाठ खोलीत घुसतात आणि अंदाधूंद गोळीबार करतात. काही सेकंदात गोळीबार करून आरोपी लगेच बाहेर येतात आणि पळत सुटतात. जो आरोपी सगळ्यात आधी खोलीत जातो. तो सगळ्यात उशिराने बाहेर येतो. इतर आरोपी पळत जातात, पण तो सावकाश चालत जातो.
रुग्णालयात घुसून हत्या, व्हिडीओ बघा
हत्या करण्यात आलेला व्यक्ती कोण?
पाच जणांनी ज्या व्यक्तीची हत्या केली, त्याचे नाव चंदन मिश्रा असे आहे. तो पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो रुग्णालयात दाखल झाला होता. उपचार सुरू असतानाच त्याची हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी साडेसात वाजता ही घटना घडली.
ज्याची हत्या करण्यात आली, तोही बक्सरमधील कुख्यात गुंड होता. अनेक हत्या प्रकरणांमध्ये चंदन मिश्रा आरोपी होता. एका गुन्ह्यात त्याला शिक्षा मिळालेली होती. तो कुख्यात असल्यानेच बक्सर तुरुंगातून त्याला भागलपूर तुरुंगात पाठवण्यात आलेले होते.