पसार तरुणाला पुणे पोलिसांनी पकडले, अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 17:25 IST2023-04-30T17:24:59+5:302023-04-30T17:25:20+5:30
त्याला संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

पसार तरुणाला पुणे पोलिसांनी पकडले, अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल
रामप्रसाद चांदघोडे -
घारगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आणि एक वर्षापासून पसार असलेल्या ४० वर्षीय तरुणाला पुणे जिल्ह्यातील पोलिसांनी पकडले. आळेफाटा ग्रामीण पोलिसांनी रविवारी ( दि.३०) पसार असलेल्या नवनाथ आनंदा चव्हाण ( वय ४०, रा. कोठे बुद्रुक, ता. संगमनेर ) याला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथून पकडले, त्याला संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, घारगाव तालुका पोलिस ठाण्याचे हद्दीत अल्पवयीन मुलीवर नवनाथ चव्हाण याने २३ एप्रिल २०२२ ला अत्याचार केला होता. त्यानुसार घारगाव पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा २०१२ चे कलम ४ प्रमाणे अनुसूचित जाती जमाती कायदा कलम ३ (२) (५) व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तो पसार होता. आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पसार असलेल्या आरोपींचा शोध मोहिमेबाबत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या आदेशानुसार आळेफाटा पोलीस आरोपींचा शोध घेत असताना त्यांना पिंपळवंडी परिसरात एक संशयित व्यक्ती मिळून आली. त्यांनी त्यास ताब्यात घेत अधिक चौकशी केली असता त्याचे नाव नवनाथ चव्हाण असे समजले. त्याच्यावर घारगाव पोलीस ठाण्यात अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल आहे. तो गुन्हा घडल्यापासून पसार असल्याचे निष्पन्न झाले. आळेफाटा पोलिसांनी चव्हाण याला घारगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.
उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे, पोलिस उपनिरीक्षक अनिल पवार, विनोद गायकवाड, पंकज पारखे, पोपट कोकाटे, अमित माळुंजे, हनुमंत ढोबळे, सचिन राहणे, प्रशांत तांगडकर यांच्या पथकाने केली.