आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 10:02 IST2025-08-13T10:01:46+5:302025-08-13T10:02:20+5:30
एका तरुणीने आपल्या मैत्रिणींसोबत मिळून स्वतःच्याच घरातून तिजोरीतून लाखो रुपयांचे दागिने चोरले.

AI Generated Image
'घर का भेदी लंका ढहाए' ही म्हण तुम्ही ऐकली असेलच. उत्तर प्रदेशातील रायबरेलीतून अशीच एक घटना समोर आली आहे. इथे एका घरातून तिजोरीतून लाखो रुपयांचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली आहे. एकीकडे घरात चोरी झाल्यामुळे कुटुंब तणावात होतं, पण जेव्हा कळलं की चोर दुसरी कोणी नसून घरातील मुलगीच आहे, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. मुलीने आपल्या मैत्रिणींच्या मदतीने ही चोरी केल्याचे समोर आले.
पोलिसांनी या गुन्ह्यात सामील असलेल्या सर्व आरोपींना अटक करून कोर्टात हजर केलं. मात्र, नंतर त्यांना जामीन मिळाला. ही घटना रायबरेली जिल्ह्यातील गुरबख्शगंज पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. इथे एका तरुणीने आपल्या मैत्रिणींसोबत मिळून स्वतःच्याच घरातून तिजोरीतून लाखो रुपयांचे दागिने चोरले. लोक बाहेरच्या चोरांपासून घराचं रक्षण करतात, पण जेव्हा घरातीलच कोणी विश्वासघात करतं, तेव्हा विश्वासाचा पायाच डळमळतो.
मुलगीच निघाली चोर
या कुटुंबाचे प्रमुख गुड्डू आपल्या पत्नी आणि मुलगी-जावयासोबत हरियाणाला मजुरीसाठी गेले होते. घर सोडण्यापूर्वी त्यांनी सर्व मौल्यवान दागिने सुरक्षित ठेवले होते. यादरम्यान त्यांची मुलगी सोनाली आणि जावई अधूनमधून घरी येत-जात होते. सुमारे दोन महिन्यांनंतर जेव्हा गुड्डू परतले, तेव्हा त्यांना दिसलं की तिजोरीतून सर्व दागिने गायब आहेत. यानंतर त्यांची पत्नी आशा अवस्थी यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांच्या तपासामध्ये संशयाची सुई मुलगी सोनालीवर फिरली. चौकशीदरम्यान सोनालीने आपल्या आईसमोर संपूर्ण सत्य कबूल केलं.
कोर्टातून मिळाला जामीन
पोलिसांनी सोनाली आणि तिच्या तीन मैत्रिणी - मुस्कान, सुमन आणि हिमांशी यांना अटक केली. चौकशीदरम्यान त्यांनी चोरी केलेले दागिने कोणत्या ज्वेलर्सना विकले, हे सांगितलं. पोलिसांनी त्या दुकानांतून दागिने परत मिळवले आहेत. चारही आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं, जिथे एसीजेएम प्रभाष कुमार यांनी त्यांना जामीन मंजूर केला.