... Otherwise I will die and kill you too! threaten to girl | ...नही तो मैं मर जाऊंगा और तुझेभी मार डालुंगा!
...नही तो मैं मर जाऊंगा और तुझेभी मार डालुंगा!

ठळक मुद्देपीडित १८ वर्षीय मुलगी आणि आरोपी तरुण यांची आधीच ओळख होती. पीडित तरुणी धीम्या लोकलमध्ये चढत असताना अरबाजने तिची बॅग खेचून पाठीमागे खेचले.

मुंबई - विद्याविहार रेल्वे स्थानकावर सोमय्या कॉलेजमधील एका १८ वर्षीय मुलीची एका तरुणाकडून दररोज छेड काढण्यात येत होती. यासंदर्भात मुलीने कुर्लारेल्वे पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात तक्रार दिली होती. त्यानुसार, पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली असता, अरबाज नासीर (२१) या आरोपीला पकडण्यात आले असून एकतर्फी प्रेमामुळे आरोपी अरबाज हा प्रकार करत असल्याचे समोर आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १८ वर्षीय मुलगी आणि आरोपी तरुण यांची आधीच ओळख होती.

या ओळखीतून विद्याविहार रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक १वर पीडित तरुणी धीम्या लोकलमध्ये चढत असताना अरबाजने तिची बॅग खेचून पाठीमागे खेचले. त्यावर तरुणीने तुझ्याशी बोलायचे नाही, तू माझा पाठलाग करू नकोस असे सांगून रिक्षात जाऊन बसली. त्यावेळी अरबाज धक्का मारून रिक्षेत बसला आणि हाताने तरुणीला मारहाण केली. तसेच स्वतःचे डोके रिक्षाच्या मीटरवर आपटून तू मेरे साथ बात कर नही तो मै मर जाऊंगा और तुझेभी मार डालुंगा असे बोलून धमकावले. याबाबत तरुणीने कुर्ला लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानुसार पोलिसांनी पवई येथे राहणारी अरबाजला अटक केली आहे. 


Web Title:  ... Otherwise I will die and kill you too! threaten to girl
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.