विवाहबाह्य संबंधास पत्नीचा विरोध, पतीने खून करून मृतदेह विजेच्या टॉवरला लटकवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 13:53 IST2022-07-13T13:52:22+5:302022-07-13T13:53:19+5:30

Extra Marital Affairs : या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक करून कारागृहात रवानगी केली.

Opposing the wife's extramarital affair, the husband murdered her and hung her body on a power tower | विवाहबाह्य संबंधास पत्नीचा विरोध, पतीने खून करून मृतदेह विजेच्या टॉवरला लटकवला

विवाहबाह्य संबंधास पत्नीचा विरोध, पतीने खून करून मृतदेह विजेच्या टॉवरला लटकवला

बिहारमधील समस्तीपूरमध्ये एका महिलेला पतीच्या अवैध संबंधांना विरोध करणे महागात पडले. पतीने पत्नीचा खून करून मृतदेह विजेच्या टॉवरला लटकवला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक करून कारागृहात रवानगी केली.

ही घटना मुसरीघरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील आहे, जिथे एका विवाहित महिलेचा मृतदेह विजेच्या टॉवरला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. याची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. तपासादरम्यान मृत महिला ही आरोपीची पहिली पत्नी असल्याचे समोर आले. तिच्या पतीचे दुसरे लग्न करण्यासोबतच काही महिलांशी अवैध संबंध होते. तिने अनेकदा विरोध केला.

महिलेने जेव्हा जेव्हा आरोपीच्या अवैध संबंधांवर प्रश्न उपस्थित केला. तेव्हा दोघांमध्ये भांडण सुरू झाले. यासाठी तो तिला नेहमी मारहाण करायचा. एके दिवशी वाद अधिकच वाढत गेला आणि आरोपीने महिलेचा जीव घेतला. पहिल्या पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पतीने पुरावा लपवण्यासाठी घरापासून काही अंतरावर असलेल्या विजेच्या टॉवरला गळफास लावून घेतल्याचा बनाव रचला आहे.

सोमवारी सकाळी महिलेचा मृतदेह लटकलेला पाहून ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून तपास सुरू केला. या घटनेनंतर कुटुंबीयांची दुरवस्था झाली आहे.

मुलाने एफआयआर दाखल केला
या प्रकरणी मृत महिलेच्या मुलाने आपल्याच वडिलांविरुद्ध मुसरीघरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मुलाचे म्हणणे आहे की, त्याच्या वडिलांचे दुसऱ्या महिलेसोबत अवैध संबंध होते. त्याच्या आईने अनेकदा विरोध केला. याच कारणावरून वडिलांनी आईची हत्या करून मृतदेह विजेच्या टॉवरला लटकवला. मुसरीघरी पोलीस ठाण्याचे अधिकारी पंकज कुमार यांनी सांगितले की, मुलाने वडिलांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. आरोपी वडिलांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

 

Web Title: Opposing the wife's extramarital affair, the husband murdered her and hung her body on a power tower