मृत्यूचा सापळा! खड्ड्यामुळे तरुणाचा बळी, पोलीस म्हणाले, "२०० मीटरच्या परिसरात लोकेशन, शोधा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 13:28 IST2026-02-06T13:26:05+5:302026-02-06T13:28:58+5:30

दिल्लीच्या जनकपुरी परिसरात खोदलेल्या एका उघड्या खड्ड्याने पालम येथील रहिवासी कमल नावाच्या तरुणाचा बळी घेतला आहे.

open pit claims life in delhi family alleges negligence police role questioned | मृत्यूचा सापळा! खड्ड्यामुळे तरुणाचा बळी, पोलीस म्हणाले, "२०० मीटरच्या परिसरात लोकेशन, शोधा"

फोटो - आजतक

दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्याने प्रशासनाची असंवेदनशीलता आणि निष्काळजीपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. दिल्लीच्या जनकपुरी परिसरात खोदलेल्या एका उघड्या खड्ड्याने पालम येथील रहिवासी कमल नावाच्या तरुणाचा बळी घेतला आहे. हा अपघात भीषण आहे कारण काही दिवसांपूर्वी ग्रेटर नोएडा येथे झालेल्या इंजिनिअर युवराज मेहताचा देखील असाच मृत्यू झाला होता.

धक्कादायक बाब म्हणजे रस्त्याच्या मध्यभागी मृत्यूचा हा खड्डा उघडा पडला होता, मात्र तिथे ना कोणतं बॅरिकेडिंग होतं, ना कोणताही धोक्याचा इशारा देणारा बोर्ड लावला होता. अंधारात बाईकस्वार कमल हा खड्ड्यात पडला. जेव्हा अपघात झाला आणि एका तरुणाचा जीव गेला, तेव्हा घाईघाईने प्रशासनाने त्या ठिकाणी 'पडदे' लावून खड्डा झाकण्याचा प्रयत्न केला.

"मुलगा रात्रभर तडफत होता"

कमलच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, कमल रात्रभर त्या खड्ड्यात पडून तडफत होता, पण त्याला वाचवण्यासाठी कोणतीही सरकारी मदत पोहोचली नाही. कुटुंबीय रात्रभर त्याचा शोध घेण्यासाठी एका नव्हे तर अनेक पोलीस ठाण्यांच्या चकरा मारत होते, पण पोलिसांनी कोणतीही मदत केली नाही. सकाळी ७ च्या सुमारास पोलिसांनी फोन करून मृतदेह मिळाल्याची माहिती दिली.

"२०० मीटर परिसरात लोकेशन, शोधू शकत असाल तर शोधा"

कमलच्या भावाने सांगितलं, "हा स्पष्टपणे निष्काळजीपणा आहे. आम्ही मंगोलपुरी, रोहिणी, जनकपुरीसह ७-८ पोलीस ठाण्यांमध्ये गेलो. दिल्ली पोलिसांनी खूप विनवण्या केल्यानंतर मोबाईल ट्रेस केला आणि सांगितलं की, 'जनकपुरीच्या २०० मीटर परिसरातील लोकेशन आहे, शोधू शकत असाल तर शोधा.' त्यानंतर सकाळी ६:३० वाजता पोलिसांनी फोन करून सांगितलं की, माझा भाऊ खड्ड्यात पडला आहे."

प्रत्यक्षदर्शीचा खळबळजनक दावा

या प्रकरणात कमलच्या मित्राने आणि प्रत्यक्षदर्शीने दिल्ली पोलिसांच्या दाव्यावरच प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रत्यक्षदर्शीचा दावा आहे की, "आधी त्या खड्ड्यात मृतदेह नव्हता, मग अचानक सकाळी ७ वाजता तिथे मृतदेह कसा आला?" हा वेदनादायक अपघात कॅबिनेट मंत्री आशिष सूद यांच्या विधानसभा मतदारसंघात झाला आहे. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Web Title : लापरवाही: दिल्ली में खुले गड्ढे ने ली युवक की जान

Web Summary : दिल्ली में एक खुले गड्ढे में गिरने से एक युवक की मौत हो गई। परिवार ने खोज में पुलिस की लापरवाही का आरोप लगाया है। दुखद घटना की जांच के आदेश दिए गए हैं।

Web Title : Negligence: Open Pit Claims Young Man's Life in Delhi

Web Summary : A young man died in Delhi after falling into an uncovered pit. Family alleges police negligence in the search. Investigation ordered into the tragic incident.