केवळ २५ हजारासाठी काकाने अल्पवयीन पुतणीचे दिले लग्न लावून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 22:07 IST2018-08-23T22:06:42+5:302018-08-23T22:07:35+5:30

ही मुलगी पश्चिम बंगालच्या कुतुबगंज गावातील असून तिच्या काकाने वांद्रे बेहरामबाग येथे राहणाऱ्या साजिद शेख याच्याशी तिचे लग्न लावल्याचे समोर आले. नवरा रोज दारू पिऊन मारहाण आणि लैंगिक अत्याचार करीत असल्याने घरातून पळाल्याचे या मुलीने सांगितले. 

For only 25 thousand, uncle has given the consent of younger | केवळ २५ हजारासाठी काकाने अल्पवयीन पुतणीचे दिले लग्न लावून 

केवळ २५ हजारासाठी काकाने अल्पवयीन पुतणीचे दिले लग्न लावून 

मुंबई - केवळ २५ हजार रुपयांसाठी अल्पवयीन पुतणीच्या जन्मदाखल्यावर खाडाखोड करून तिची गाठ एका तरुणाशी बांधली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष क्रमांक ९ च्या पथकाने अटक केली. साजिद मुस्तफा शेख आणि तोमेर नौशाद अली शेख अशी या अटक आरोपीचीनावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून या मुलीची मूळ कागदपत्रे हस्तगत केली आहेत.मुलीने दिलेल्या त्रोटक माहितीवरून कक्ष ९ च्या पथकाने तिचा पती साजिद आणि काका नौशाद याला शोधून काढले. साजिद याने पत्नी हरविल्याची तक्रार निर्मलनगर पोलिस ठाण्यात केली होती. पत्नी अल्पवयीन आहे हे पोलिसांना समजू नये यासाठी त्याने मूळ जन्मदाखल्यावरील व्हाईट इंक लावून त्यावरील साल बदलून २००० असा बदल केला होता. पोलिसांनी पॉक्सो, बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दखल करून दोघांनाही अटक केली.मुलीचा काका तोमर याला साजिद याने २५ हजार रुपये दिल्याचे चौकशीतून स्पष्ट झाले आहे. केवळ पैशासाठी तोमर आपल्या पुतणीचे लग्न लावण्यासाठी तयार झाला. या मुलीची आई आणि भाऊ दोघे नोकरीसाठी नवी दिल्ली येथे राहत असून मी मुलगी काकाकडे राहून शिकत होती. पण तिचे शिक्षण मध्येच थांबवून काकाने जबरदस्तीने लग्न लावून दिले.

वांद्रे पश्चिमेकडील शांती आवेदना रुग्णालयाजवळ एक १५ वर्षांची मुलगी रडत बसली असल्याची माहिती एका इसमाने कक्ष ९ च्या पोलिस निरीक्षक आशा कोरके यांना दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कोरके आणि महिला अंमलदारांचे पथक या ठिकाणी रवाना झाले. या मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले. पण तिला बंगाली भाषेव्यतिरिक्त कोणतीच भाषा समजत नव्हती. बंगाली भाषा बोलणाऱ्या दुभाषाच्या मदतीने पोलीसांनी या मुलीची चौकशी केली. ही मुलगी पश्चिम बंगालच्या कुतुबगंज गावातील असून तिच्या काकाने वांद्रे बेहरामबाग येथे राहणाऱ्या साजिद शेख याच्याशी तिचे लग्न लावल्याचे समोर आले. नवरा रोज दारू पिऊन मारहाण आणि लैंगिक अत्याचार करीत असल्याने घरातून पळाल्याचे या मुलीने सांगितले. 

 

 

Web Title: For only 25 thousand, uncle has given the consent of younger