शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन लग्न जुळले, पण तो आधीच होता विवाहित; आरोपी गजाआड, दीड वर्षाने गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 03:59 IST

डोंबिवलीतील ३० वर्षांच्या तरुणीने लग्न जुळविणाऱ्या संकेतस्थळावर विवाहासाठी नोंदणी केली होती.

डोंबिवली : लग्न जुळविणाऱ्या संकेतस्थळावर दोघांचे लग्न जुळले, पण लग्नाच्या तीन दिवस आधी तरुण विवाहित असल्याचे उघड झाले. फसवणूक झाल्याचे कळताच पीडित तरुणीने विष्णूनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार देण्याचा प्रयत्न केला, परंतु तिला दाद मिळाली नाही. अखेर, पुरावे गोळा करत ते वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिल्यावर दीड वर्षाने गुन्हा दाखल झाला असून विजय जगदाळे (रा. नवी मुंबई) याला शुक्रवारी अटक झाली आहे. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

डोंबिवलीतील ३० वर्षांच्या तरुणीने लग्न जुळविणाऱ्या संकेतस्थळावर विवाहासाठी नोंदणी केली होती. जगदाळे याने तिला पसंत केले. यावर त्याच्या वडिलांनी तरुणीच्या वडिलांशी संपर्क साधून लग्नासाठी मागणी घातली. यानंतर त्यांचा साखरपुडा झाला. २६ मे २०१९ ला लग्न होणार होते. परंतु, तीन दिवस आधी ‘ज्या तरुणाशी तुझे लग्न ठरले आहे, तो माझा पती आहे. तो आधीच विवाहित आहे,’ असा एका महिलेचा संदेश पीडित तरुणीला आला. आपली फसवणूक झाल्याने जगदाळेविरोधात तक्रार देण्यासाठी तरुणीने विष्णूनगर पोलीस ठाणे गाठले. परंतु, सबळ पुराव्यांअभावी तक्रार दाखल करता येत नाही, असे सांगत तिची तक्रार नोंदवण्यास नकार देण्यात आला.जूनमध्ये तरुणीला जगदाळे व त्याच्या पत्नीने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केल्याची माहिती मिळाली. हा पुरावा घेऊन तिने ठाणे पोलीस आयुक्तालयात वरिष्ठांची भेट घेतली. त्यानंतर विष्णूनगर पोलिसांनी विजय जगदाळे, त्याचे वडील रामचंद्र आणि आई अनिता अशा तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तसेच तिच्या तक्रारीवरून विजयविरोधात लैंगिक अत्याचाराचाही गुन्हा दाखल झाला आहे.

जामीन अर्ज फेटाळताच पोलिसांनी केली अटकआरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी कल्याण आणि मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केले होते. यात विजयचा अर्ज फेटाळण्यात आल्याने त्याला शुक्रवारी अटक झाली. पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने मंगळवारी विजयला पुन्हा कल्याण सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे.  

‘कठोर शिक्षा व्हावी’विजयचे आणखीन एक लग्न झाल्याची माहिती मिळत आहे. त्याने केवळ माझीच नव्हे तर अन्य महिलांचीही फसवणूक केली आहे. त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून अन्य मुलींची फसवणूक होता कामा नये, अशी मागणी पीडित तरुणीने केली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसArrestअटक