शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
2
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
3
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
4
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
5
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
6
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
7
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
8
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
9
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
10
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
11
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
12
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
13
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
14
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
15
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
17
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
18
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
19
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
20
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचे पदाधिकारी जमील शेख हत्याकांडातील एक संशयित ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 14:53 IST

Jamil Shaikh Murder: राबोडीतीतील बिस्मिल्ला  हॉटेल समोरुन २४ नोव्हेंबर रोजी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास जमील हे मोटार सायकलीवरून जात असताना गोळीबार झाला होता.

जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मनसेचे राबोडीतील प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांच्या हत्ये प्रकरणातील शाहिद शेख (३५, रा. राबोडी, ठाणे) या  संशयितास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने लोकमत ला दिली. या हत्याकांडातील आरोपींना अटक केल्याशिवाय जमील यांचा दफनविधी करणार नाही, असा पवित्रा मनसे तसेच जमील च्या  कुटूबीयांनी घेतला होता.त्यामुळे या खुनातील आरोपींना पकडणे ठाणे पोलिसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते.


राबोडीतीतील बिस्मिल्ला  हॉटेल समोरुन २४ नोव्हेंबर रोजी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास जमील हे मोटार सायकलीवरून जात असताना त्यांच्या मागून दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्याने त्यांच्यावर अगदी जवळून गोळीबार केला होता. त्यानंतर हल्लेखोर हे पसार झाले होते. या खुनातील आरोपी कितीही मोठा असला तरी त्याची गय केली जाणार नाही. तपास नि:पक्ष पणे केला जाईल, असे आश्वासन ठाण्याचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी जमीलच्या नातेवाईकांना दिले होते.

त्यामुळे राबोडी पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभाग अशी पाच पथके या तपासासाठी नेमण्यात आली आहेत. शाहिद याचा या खुनात नेमकी कशाप्रकारे सहभाग आहे, याची चौकशी करण्यात येत असल्याची माहीती सूत्रांनी दिली.

टॅग्स :MNSमनसेMurderखून