पश्चिम दृतगती महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 13:12 IST2019-03-19T13:12:25+5:302019-03-19T13:12:47+5:30
हा अपघात नेमका कसा घडला याबाबत चौकशी सुरू आहे.

पश्चिम दृतगती महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू
मुंबई - गोरेगाव पश्चिम दृतगती महामार्गावर मंगळवारी सकाळी अपघातात एकाचा मृत्यू झाला. मृत पावलेला इसम हा इंग्रजी माध्यम शाळेचा बसचालक असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. वनराई पोलिसांनी याप्रकरणी घटनास्थळी धाव घेतली असून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. हा अपघात नेमका कसा घडला याबाबत चौकशी सुरू आहे.