गोव्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत एका इसमाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 20:54 IST2019-04-04T20:51:42+5:302019-04-04T20:54:40+5:30
आज गुरुवारी त्याचे या इस्पितळात निधन झाले.

गोव्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत एका इसमाचा मृत्यू
मडगाव - गोवा राज्यातील दक्षिण गोव्यातील नुवे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने मूळ बिहार येथील बिनोद महांतो या सायकल चालकाचा मृत्यू झाला. ३ दिवसांपूर्वी अपघाताची ही घटना घडली होती. त्रेवीस वर्षीय बिनोद हा आपला सहकारी कृष्णदेव महांतो (20) याच्यासह सायकलने जात असताना अज्ञात वाहनाची त्याला जोरदार धडक बसली. यात तो गंभीर जखमी झाल्याने मागाहून त्याला उपचारासाठी गोवा वैदयकीय महाविदयालयाच्या इस्पितळात दाखल करण्यात आले.
आज गुरुवारी त्याचे या इस्पितळात निधन झाले. अपघातानंतर त्या अज्ञात वाहनाने घटनास्थळाहून पळ काढला होता. सदया त्या वाहनाचा मायणा - कुडतरी पोलीस शोध घेत आहे. भारतीय दंड संहितेच्या 279, 337 व मोटरवाहन कायदा 134 (अ) अंर्तगत पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. मायणा - कुडतरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक करिश्मा प्रभू पुढील तपास करीत आहे.