चिमुकलीच्या रडण्याचा आवाज वृद्ध महिलेने ऐकला अन् नराधमाचा बलात्काराचा प्रयत्न फसला
By पूनम अपराज | Updated: November 30, 2020 21:05 IST2020-11-30T21:03:36+5:302020-11-30T21:05:57+5:30
Attempt To Rape : मुलीचे ओरडणे ऐकून एक वयस्कर महिला तिथे पोहोचली, त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.

चिमुकलीच्या रडण्याचा आवाज वृद्ध महिलेने ऐकला अन् नराधमाचा बलात्काराचा प्रयत्न फसला
राजस्थानच्या अलवरमध्ये पोलिसांनी काल रात्री सहा वर्षाच्या निरागस मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणार्या आरोपीला अटक केली आहे. चॉकलेट देण्याचं आमिष दाखवून आरोपीने मुलीला फ्लॅटवर नेले. मुलीचे ओरडणे ऐकून एक वयस्कर महिला तिथे पोहोचली, त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.
भिवाडीच्या फुलबाग पोलिस स्टेशनमध्ये असलेल्या सोसायटीमध्ये एका युवकाने ६ वर्षाच्या निरागस मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला. अशी माहिती मिळत आहे की, अविवाहित मनुष्य भाड्याने राहत असलेल्या फ्लॅटमध्ये ही घटना घडली होता. आदल्या दिवशी आरोपी युवकाने सहा वर्षाच्या निरागस मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्या फ्लॅटवर नेले, जिथे त्या युवकाने मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला. या दरम्यान शेजारच्या राहणाऱ्या एका वृद्ध महिलेने मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकला आणि तिने घटनास्थळ गाठले. महिलेला पाहून आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.
वयोवृद्ध महिलेने या मुलीला आपल्या कुटुंबातील सदस्यांकडे नेले आणि त्यांना या प्रकरणाची माहिती दिली. कुटुंबीयांनी आरोपी युवकाविरोधात पोलिस स्टेशन फुलबाग येथे एफआयआर दाखल केला. त्वरित कारवाई करत पोलिसांनी आरोपी तरूणाला अटक केली आहे. या प्रकरणाची माहिती देताना पोलिस ठाण्याचे अधिकारी जितेंद्र सोलंकी यांनी आरोपी युवकाचे नाव सिद्धार्थ चक्रवर्ती असल्याचं सांगितलं आहे. पोलिसांनी आरोपी पश्चिम बंगालचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. आई आणि भावासोबत भिवाडी येथे राहतो. आरोपी पूर्वी टिफिन सेंटर म्हणून काम करायचा, पण कोरोनानंतर त्याचे टिफिन सेंटर बंद झाले. आरोपीची चौकशी केली जात असल्याचे पोलिस स्टेशन अधिकारी म्हणाले.