अरे बापरे! धावत्या मालगाडीत महिला सुरक्षा रक्षकाचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 13:15 IST2018-09-25T13:13:22+5:302018-09-25T13:15:21+5:30
कोळसेवाडी पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३५४ अन्वये तक्रारीची नोंद करून तपासासाठी कल्याण रेल्वे पोलिसांकडे प्रकरण वर्ग केले आहे. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस तपास करत आहेत. मात्र, महिला सुरक्षा रक्षकासोबत घडलेल्या प्रकारामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

अरे बापरे! धावत्या मालगाडीत महिला सुरक्षा रक्षकाचा विनयभंग
कल्याण - कल्याणरेल्वे यार्डाजवळ धावत्या मालगाडीतील महिला सुरक्षा रक्षकाचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. कल्याण – कसारा रेल्वे स्थानकादरम्यान मालगाडीवर कर्तव्य बजावत असलेल्या महिला सुरक्षा रक्षकाची छेडछाड केल्याची घटना घडली. मालगाडी कल्याण रेल्वे यार्डात पोहचत असताना सिग्नल लागल्याने एका ठिकाणी गाडीचा वेग कमी झाला. याचाच फायदा घेत चालत्या मालगाडीत दोन अनोळखी इसम महिला सुरक्षा रक्षकाच्या केबीनमध्ये घुसले आणि तीच्यासोबत गैरवर्तन करून छेडछाड करू लागले. महिलेने आरडाओरडा केल्याने दोन्ही भामट्यानी घटनस्थळाहून पळ काढला. त्यानंतर या घटनेप्रकरणी महिलेने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कोळसेवाडी पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३५४ अन्वये तक्रारीची नोंद करून तपासासाठी कल्याण रेल्वे पोलिसांकडे प्रकरण वर्ग केले आहे. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस तपास करत आहेत. मात्र, महिला सुरक्षा रक्षकासोबत घडलेल्या प्रकारामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.