शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
2
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
4
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
6
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
7
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
8
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
9
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
10
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
11
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
12
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
13
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
14
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
15
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
16
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
17
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
18
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
19
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
20
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
Daily Top 2Weekly Top 5

ज्योतिरादित्य शिंदे यांना काळे झेंडे दाखवणाऱ्या ३५ जणांविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 19:27 IST

शुक्रवारी सायंकाळी या घटनेत भा. दं. वि.  कलम 341 आणि 147 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देशुक्रवारी शिंदे विमानतळावर जात असताना त्यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी दगडफेकीची घटना नाकारली आणि शिंदे यांना काळे झेंडे दाखविल्याचे सांगितले.

भोपाळ - काँग्रेसमधून भाजपामध्ये दाखल झालेल्या माजी खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांना काळे झेंडे दाखविल्याप्रकरणी पोलिसांनी ३५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी शिंदे विमानतळावर जात असताना त्यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली. कमला पार्क परिसरात त्याला काळे झेंडे देखील दाखवले गेले. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शुक्रवारी संध्याकाळी येथे राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या ताफ्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले होते.

 

ज्योतिरादित्य शिंदेंवर जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न; शिवराज सिंह चौहान यांचा आरोप

 

शहरातील कमला पार्क भागात शिंदे यांची गाडी थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्याचा दावा चौहान यांनी केला आहे. मात्र, पोलिसांनी दगडफेकीची घटना नाकारली आणि शिंदे यांना काळे झेंडे दाखविल्याचे सांगितले. शहरातील एका कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर शिंदे भोपाळ येथे विमानतळावर जात होते. या प्रकरणात भाजप कार्यकर्त्यांनी श्यामला पोलीस ठाण्याला घेरावही घातला. शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विकास विरानी, माजी महापौर आलोक शर्मा, भाजपचे कार्यकर्ते व जिल्ह्यातील पक्ष अधिकारी पोलीस ठाण्यात दाखल झाले. यानंतर पोलिसांनी अज्ञात लोकांविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. श्यामला हिल्स पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी सायंकाळी या घटनेत भा. दं. वि.  कलम 341 आणि 147 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण शुक्रवारी संध्याकाळी कमला पार्क परिसरातील शिंदे यांच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्याशी संबंधित आहे.

 

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेPoliceपोलिसBJPभाजपाcongressकाँग्रेस