भाजपाच्या १० पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा; जमावबंदी आदेशाचे उल्लंघन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 21:35 IST2021-11-11T21:34:45+5:302021-11-11T21:35:13+5:30

Offence against 10 BJP workers : छत्रपती शिवाजी महाराज चौकात बुधवारी रात्री भाजपा पदाधिकाऱ्यांनी मंत्री मलिक यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली.

Offence against 10 BJP workers; Violation of the curfew order | भाजपाच्या १० पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा; जमावबंदी आदेशाचे उल्लंघन

भाजपाच्या १० पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा; जमावबंदी आदेशाचे उल्लंघन

चाळीसगाव जि. जळगाव  : अल्पसंख्याक मंत्री नबाब मलिक यांच्याविरोधात घोषणाबाजी करीत जमावबंदी आदेशाचे उल्लंघन  केल्याप्रकरणी  भाजपच्या चाळीसगाव  येथील १० पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


छत्रपती शिवाजी महाराज चौकात बुधवारी रात्री भाजपा पदाधिकाऱ्यांनी मंत्री मलिक यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली.  या प्रकरणी पोलीस नाईक भटू पाटील यांनी फिर्याद दिली. त्यावरुन भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, तालुकाध्यक्ष सुनील निकम, अमोल नानकर, संजय भास्करराव पाटील, जितेंद्र वाघ, सदानंद चौधरी, सोमसिंग राजपूत, भावेश कोठावदे  यांच्यासह १० कार्यकर्त्यांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Offence against 10 BJP workers; Violation of the curfew order