शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! तरुणीसह महिलेसोबत अश्लील चाळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 13:57 IST

दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये घाटकोपर आणि आरएके मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देकुर्ला परिसरात राहणारी २३ वर्षीय तक्रारदार तरुणी मैत्रिणीसोबत कुर्ला कमानीच्या सिमेंट फॅक्टरीजवळून जात होती. तक्रारीवरून पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे.

मुंबई - तरुणी व महिलेसोबत विकृताने अश्लील चाळे केल्याच्या दोन घटना मुंबईत घडल्या आहेत़ त्यानुसार, दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये घाटकोपर आणि आरएके मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुर्ला परिसरात राहणारी २३ वर्षीय तक्रारदार तरुणी मैत्रिणीसोबत कुर्ला कमानीच्या सिमेंट फॅक्टरीजवळून जात होती. तेथे एका विकृताने त्यांच्याशी अश्लील चाळे केले. सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. दोघींनाही या प्रकाराने धक्का बसल्याने त्यांनी तत्काळ घर गाठले. घरच्यांना घडलेला प्रकार सांगितला. संबंधित व्यक्तीबाबत माहिती काढताच त्याचे नाव कस्तान हुसेन असल्याचे समोर आले. त्यानुसार, रात्री उशिराने मुलींनी घाटकोपर पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनीविनयभंगाचा गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे.

दुसऱ्या घटनेत सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वडाळा येथील रहिवासी असलेल्या ४८ वर्षीय महिला मैत्रिणीसोबत सार्वजनिक शौचालयाकडे गेली असताना, आबीद यादअली शेखने त्यांंच्यासोबत असभ्य वर्तन केले. त्यांनी त्याला पकडून ओरड घालताच स्थानिकही जमले. त्याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानुसार, आरएके मार्ग पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करत, शेखला अटक केली आहे. या घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली होती.

टॅग्स :MolestationविनयभंगPoliceपोलिसMumbaiमुंबईKurlaकुर्लाGhatkoparघाटकोपर