शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

Parambir Singh : आता परमबीर सिंगांवरच नवा लेटरबॉम्ब; मला निलंबित करून माझं करिअर बरबाद केलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 22:22 IST

Now a new letterbomb on Parambir Singh : मुख्यमंत्री काय कारवाई करणार आणि निलंबित पोलीस अधिकाऱ्याला न्याय मिळवून देणार का ? याकडे लक्ष आहे. 

ठळक मुद्देचुकीचे आदेश देऊन आपल्या ओळखीच्या निकटवर्तियांवर गुन्हा दाखल करू नये असा दबाब गावदेवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक असताना अनुप डांगे यांच्यावर परमबीर सिंग यांनी टाकला.

बहुचर्चित मनसुख हिरेन आणि मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकासह स्कॉर्पिओ प्रकरणाने महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात एनआयएने निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची अटक केल्यानंतर मुंबईचे तत्कालीन  पोलीस यांना मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करून होमगार्डचे महासंचालक पदी बसविण्यात आले. मात्र, नाराजी व्यक्त करत परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बच्या माध्यमातून गृहमंत्र्यांवर खळबळजनक आरोप केल्यानंतर आता एका निलंबित पोलिस अधिकाऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख आणि गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना पत्र पाठवून नवा लेटरबॉम्ब टाकला आहे. त्यामुळे परमबीर सिंह हे अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे. 

हिरे व्यापारी भरत शहा यांच्यासह मुलगा, नातवावर गुन्हा दाखल

चुकीचे आदेश देऊन आपल्या ओळखीच्या निकटवर्तियांवर गुन्हा दाखल करू नये असा दबाब गावदेवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक असताना अनुप डांगे यांच्यावर परमबीर सिंग यांनी टाकला. मात्र, कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्यांविरोधात कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकारी यांची परमबीर सिंग यांची ४ जुलै २०२० मध्ये साऊथ कंट्रोल रूमला बदली केली. नंतर १८ जुलै २०२० मध्ये थेट अनुप डांगे यांचं निलंबन करण्यात आलं. त्यानंतर न्यायासाठी अनुप डांगे यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर पुन्हा आज देखील त्यांनी पत्र पाठवून अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या आणि मोक्का कायदा अंतर्गत शिक्षा झालेल्या आरोपीसोबत मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे कसे घरोब्याचे संबंध आहेत. त्याबाबत सविस्तर माहिती त्यांनी पत्रातून दिली आहे. तसेच खाकीवर हात उचलणाऱ्यांवर परमबीर सिंग कसं बळ देतात. तर शहरात कायदा व सुव्यवस्था ठेवणाऱ्या पोलिसाला निलंबित करून कशाप्रकारे त्याचे करिअर बरबाद केलं जाते याची इत्यंभूत माहिती पत्रातून डांगे यांनी दिली आहे. त्यावर मुख्यमंत्री काय कारवाई करणार आणि निलंबित पोलीस अधिकाऱ्याला न्याय मिळवून देणार का ? याकडे लक्ष आहे. 

नेमकं कोणत्या गुन्ह्यात डांगे यांनी केली होती कारवाई 

गावदेवी पोलीस ठाण्याच्या पोलिसाला मारहाण झाल्याच्या प्रकरणात सहआरोपी असलेले चित्रपट निर्माते भरत शहा व त्यांचा मुलगा राजीव यांना अतिरिक्त सत्र न्यायालयाने डिसेंबर २०१९मध्ये  अटकपूर्व जामीन मंजूर केला.

दक्षिण मुंबईतील भुलाभाई देसाई रोडवरील 'डर्टी बन्स' या पबमध्ये काही दिवसांपूर्वी पहाटेच्या वेळेस दोन गटांमध्ये वाद झाला होता. त्यावेळी नाईट राउंडला अनुप डांगे होते. त्यांनी लेट नाईट सुरु असलेल्या पबबाबत विचारणा केली. त्यावेळी त्यांनाच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने धमकावण्यात आले होते. गावदेवी पोलिस ठाण्यातील पोलिस तिथे पोचले असता, भरत शहा यांचा नातू यश याने पोलिसाला मारहाण केली, असा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवून यश व अन्य दोन जणांना अटक केली. त्यानंतर भरत शहा (७५) व त्यांचा मुलगा राजीव (५५) पोलिस ठाण्यात पोहोचले. त्यांनीही पोलिसांविषयी अर्वाच्य भाषा वापरली आणि पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, अशा आरोपाखाली पोलिसांनी आणखी एक गुन्हा नोंदवला. त्यामुळे अटकेची टांगती तलवार असल्याने या दोघांनीही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. 'पोलिस हे यश व अन्य दोघांना अमानवी पद्धतीने मारहाण करत होते. त्यावेळी संबंधित पोलिस अधिकारीच आक्रमकपणे वागत होता आणि उलट आमच्याविरुद्धच गुन्हा नोंदवण्यात आला', असा आरोप शहा पितापुत्रांनी अर्जात केला होता.

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगsuspensionनिलंबनChief Ministerमुख्यमंत्रीUddhav Thackerayउद्धव ठाकरेHome Ministryगृह मंत्रालयAnil Deshmukhअनिल देशमुखPoliceपोलिसunderworldगुन्हेगारी जगत