सातारा, सांगली,कोल्हापूर आणि ठाणे जिल्ह्यात प्रचंड दहशत असलेला कुख्यात वाळू तस्कर जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 21:14 IST2020-08-24T21:13:26+5:302020-08-24T21:14:32+5:30

आरोपीवर गंभीर स्वरुपाचे १८ गुन्हे दाखल..

Notorious sand smuggler arrested who create terror in Satara, Sangli, Kolhapur and Thane districts | सातारा, सांगली,कोल्हापूर आणि ठाणे जिल्ह्यात प्रचंड दहशत असलेला कुख्यात वाळू तस्कर जेरबंद

सातारा, सांगली,कोल्हापूर आणि ठाणे जिल्ह्यात प्रचंड दहशत असलेला कुख्यात वाळू तस्कर जेरबंद

ठळक मुद्देया प्रकरणात ४७ गावठी पिस्टल आणि ६८ जिवंत काडतुसे जप्त

पिंपरी : सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात दहशत असलेला कुख्यात वाळू तस्कराला जेरबंद करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी ही कारवाई केली. त्याच्याकडून चार पिस्टल आणि दोन काडतुसे जप्त केली. तर अन्य एकाला अटक करून त्याच्याकडून एक पिस्टल आणि दोन काडतुसे पोलिसांनी जप्त केली.
सोमनाथ उर्फ सोमाभाई रमेश चव्हाण (वय ३०, रा. कालगाव, ता. कराड, जि. सातारा) तसेच संतोष चंदू राठोड (वय २३, रा. तळेगाव दाभाडे), असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवैध अग्निशस्त्रांचा व्यापार करणाऱ्या  मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील आंतरराज्यीय टोळीचा जुलै २०२० मध्ये पदार्फाश केला होता. त्यावेळी पोलिसांनी १९ लाख ८९ हजार ५०० रुपये किमतीच्या ४२ पिस्टल, गावठी कट्टे आणि ६४ काडतुसे जप्त केली होती. १५ आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. तर आणखी नावे निष्पन्न झालेल्यांवरही कारवाईचे सत्र सुरू होते. दरम्यान, युनिट चारच्या पथकातील सात पोलिसांना कोरोनाची लागण झाली. ते सर्व पोलीस कोरोनामुक्त झाल्यानंतर तपास पुन्हा सुरू झाला. 

नाव निष्पन्न झालेला आरोपी संतोष याच्यावर २०१८ मध्ये लोणावळा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. काही दिवसांपूर्वी आरोपी संतोष त्या गुन्ह्यात येरवडा कारागृहातून बाहेर आला. पोलिसांनी त्याला १० ऑगस्ट रोजी चिंचवड परिसरातून अटक केली. त्याच्याकडून एक गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. याच प्रकरणात सातारा जिल्ह्यातील कुख्यात वाळू तस्कर सोमनाथ चव्हाण याचेही नाव निष्पन्न झाले. त्याला उंब्रज पोलिसांनी काही दिवसांपूर्वी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याप्रकरणी तसेच शासकीय सेवकाला काम करण्यास अडथळा आणल्याप्रकरणी अटक केली. सोमनाथ सातारा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्याला १७ ऑगस्ट रोजी कारागृहातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून चार गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली.

गुन्हे शाखा युनिट चारने आजवर या प्रकरणात ४७ गावठी पिस्टल आणि ६८ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, पोलीस कर्मचारी प्रवीण दळे, नारायण जाधव, संजय गवारे, धर्मराज आवटे, दादाभाऊ पवार, अदिनाथ मिसाळ, संतोष असवले. तुषार शेटे, लक्ष्मण आढारी, मोहम्मद गौस नदाफ, वासुदेव मुंडे, शावरसिध्द पांढरे, प्रशांत सैद, सुनील गुट्टे, तुषार काळे, सुरेश जायभाये, अजिनाथ ओंबासे, धनाजी शिंदे, सुखदेव गावंडे, गोविंद चव्हाण, नागेश माळी, राजेंद्र शेटे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

गंभीर स्वरुपाचे १८ गुन्हे दाखल
आरोपी सोमनाथ हा कुख्यात वाळू तस्कर आहे. तो सातारा परिसरात ‘शूट ग्रुप’ नावाची गुन्हेगारी टोळी आणि ‘आई साहेब प्रतिष्ठान’ नावाची संघटना चालवितो. त्याची सातारा, सांगली, कोल्हापूर आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये प्रचंड दहशत आहे. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे १८ गुन्हे दाखल आहेत. निगडी परिसरात २०१६ मध्ये कुख्यात गुंड कृष्णा डांगे उर्फ केडी भाई याचा खून झाला. या खून प्रकरणात सोमनाथ चव्हाण मुख्य आरोपी आहे. तसेच २०१८ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या ठाणे जिल्हा उपाध्यक्षावर झालेल्या खुनी हल्ल्यातील सोमनाथ हा मुख्य सूत्रधार होता.

Web Title: Notorious sand smuggler arrested who create terror in Satara, Sangli, Kolhapur and Thane districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.