ग्रेटर नोएडा येथील निक्की भाटी हत्या प्रकरणासारखाच एक धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील अमरोहामध्येही समोर आला आहे. एका कॉन्स्टेबलने त्याच्या कुटुंबासह पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. गंभीरपणे जळालेल्या महिलेला दिल्लीला रेफर करण्यात आले आहे. तिची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी आरोपी कॉन्स्टेबलसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या त्यांचा शोध सुरू आहे.
मंगळवारी अमरोहाच्या दिदौली पोलीस स्टेशन परिसरातील नारंगपूर गावात ही घटना घडली. देवेंद्र असं आरोपी पतीचं नाव आहे, तर पत्नीचं नाव पारुल आहे. पारुलच्या कुटुंबातील पाच सदस्यांचा यात समावेश आहे, त्यांनी तिला जिवंत जाळल्याचा आरोप आहे. पारुलला गंभीर अवस्थेत दिल्लीला रेफर करण्यात आलं आहे, जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
पारुलची आई अनिता यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मुलीचं लग्न १३ वर्षांपूर्वी देवेंद्रशी झालं होतं. त्यांना दोन जुळी मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. पारुल ही आरोग्य विभागात जीएनएम म्हणून काम करते. तिची आई अनिता यांना शेजाऱ्यांनी फोनवरून घटनेची माहिती दिली. जेव्हा ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा पारुल जळलेल्या अवस्थेत वेदनेने तडफडत होती.
"न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
पारुलला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला उच्च रुग्णालयात रेफर करण्यात आलं. सध्या तिच्यावर दिल्लीत उपचार सुरू आहेत आणि तिची प्रकृती चिंताजनक आहे. पारुलच्या भावाच्या तक्रारीवरून, आरोपी कॉन्स्टेबल पती देवेंद्र, भाऊ सोनू, वडील गजेश, आई अनिता, जितेंद्र आणि संतोष यांच्याविरुद्ध दिदौली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेपासून आरोपी कुटुंब फरार आहे आणि पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.