Video : अनैतिक संबंधातून जन्मलेलं नवजात बाळ आईने धावत्या लोकलमध्ये पिशवीत गुंडाळून ठेवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 22:25 IST2021-12-10T22:24:06+5:302021-12-10T22:25:06+5:30
Crime News : नवजात बाळाला प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून सोडणाऱ्या महिलेला अखेर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. कल्याण क्राईम ब्रांचच्या युनिट ३ ने महिलेसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

Video : अनैतिक संबंधातून जन्मलेलं नवजात बाळ आईने धावत्या लोकलमध्ये पिशवीत गुंडाळून ठेवलं
आईच्या काळजाला चटका लावणारी बातमी कल्याण येथून समोर आली आहे. धावत्या लोकलमध्ये एका नवजात बाळाला प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून सोडणाऱ्या महिलेला अखेर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. कल्याण क्राईम ब्रांचच्या युनिट ३ ने महिलेसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
डोंबिवलीत राहणाऱ्या एका महिनेने तिचे नवजात बाळ टिटवाळा रेल्वे स्थानकात लोकलमध्ये सोडून पळ काढला होता. कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने या महिलेसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे. 20 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली होती.
20 नोव्हेंबर रोजी टिटवाला रेल्वे स्थानकात ट्रेन मध्ये एका पिशवीत नवजात बाळ आढळून आले होते. कल्याण जीआरपीने या प्रकरणी भादंवि 317 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणाचा तपास कल्याण जीआरपी सह कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचही तपास करीत होते. हा तपास करीत असताना क्राईम ब्रांचने सर्व स्थानकातील सीसीटीव्ही तपासले. कोपर रेल्वे स्थानकातून एक महिला स्थानकात बसली होती. तिच्या हाती एक पिशवी होती. ज्या पिशवीत ते बाळ सापडले. ती पिशवी आणि महिलेच्या हातातील पिशवी सारखीच दिसून आली. तिच महिला असावी अशी पोलिसांना शक्यता होती. याच शक्येतेच्याआधारे पोलिसांनी तपास केला. या महिलेचा पोलिसांनी पत्ता शोधून काढला. ही महिला डोंबिवलीच्या देवीच्या पाडा परिसरात राहणारी आहे.
धावत्या लोकलमध्ये एका नवजात बाळाला प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून सोडणाऱ्या महिलेला अखेर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. कल्याण क्राईम ब्रांचच्या युनिट ३ ने महिलेसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे. pic.twitter.com/dh2K2t0hYf
— Lokmat (@lokmat) December 10, 2021
या बाबत कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचचे पोलिस अधिकारी अशरद शेख यांनी माहिती दिली आहे की, या महिलेचे एका विवाहित पुरुषासोबत संबंध होते. त्या महिलेला त्याने घर घेऊन दिले होते. त्यांच्या दोघांतील अनैतिक संबंधामुळे तिने बाळाला जन्म दिला. हे बाळ नकोसे झाल्याने तिने बाळाला रेल्वे ट्रेनमध्ये सोडले होते. यात तिच्या प्रियकराचाही समावेश होता. पोलिसांनी या दोघांना बेडय़ा ठोकल्या आहेत. अनैतिक संबंधातून हे मुल जन्माला आले होते. त्याचे पालकत्व लपवण्यासाठी त्यांनी हे वाईट कृत्य केल्याचं कबुल केलं आहे.