शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

दुचाकी शिकताना नवविवाहितेचा मृत्यू : भिंतीला धडकली अ‍ॅक्टिव्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 12:13 AM

दुचाकी शिकताना अ‍ॅक्टिव्हावरील नियंत्रण सुटल्यामुळे नवविवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री शांतिनगर पोलीस ठाण्यांतर्गत रामसुमेरनगरात घडली.

ठळक मुद्देनागपूरच्या शांतिनगरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुचाकी शिकताना अ‍ॅक्टिव्हावरील नियंत्रण सुटल्यामुळे नवविवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री शांतिनगर पोलीस ठाण्यांतर्गत रामसुमेरनगरात घडली. डोक्यावर हेल्मेट नसल्याने गंभीर दुखापत झाली. परिणामत: सुखी संसाराची स्वप्ने पाहण्याआधीच या नवविवाहितेचा दुर्दैवी अंत झाला.शिवानी युवराज वाणी (२०) असे नवविवाहितेचे नाव आहे. महिनाभरापूर्वीच तिचे लग्न झाले होते. लग्नानंतर ती पहिल्यांदा माहेरी आली होती. दोन-तीन दिवसांपासून माहेरच्या मंडळींसोबत आनंदात मुक्कामाला होती. तिला दुचाकी चालविणे शिकायचे होते. त्यामुळे शेजाऱ्यांना अ‍ॅक्टिव्हा मागितली. अनुभव नसल्यामुळे कुटुंबीयांनी तिला मनाई केली. परंतु शिवानीने प्रॅक्टिस करणार असल्याचे सांगितले. सायंकाळी ७ वाजता घराजवळच अ‍ॅक्टिव्हा चालवीत असतानाच अचानकपणे अनियंत्रित होऊन रेल्वे परिसराच्या भिंतीला धडकली. यात तिचे डोके जोरात भिंतीवर आदळले. मोठी जखम झाल्यामुळे नातेवाईकांनी रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.शिवानीच्या मृत्यूची माहिती कळताच परिसरात शोककळा पसरली. लग्नांतर ती खूप आनंदात होती. तिच्या आईवडिलांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. कुटुंबात दोन भाऊ आहेत. लग्नाच्या महिनाभरातच शिवानीला जीव गमवावा लागेल याचा कुणीच विचार केला नव्हता. तिने हेल्मेट घालून कुणाच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅक्टिव्हा चालविणे शिकले असते तर ही घटना घडली नसती. हवालदार सुधीर खुबाळकर यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू