Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 11:59 IST2025-07-12T11:58:52+5:302025-07-12T11:59:30+5:30
Radhika Yadav : गुरुग्राममधील टेनिसपटू राधिका यादवच्या हत्येप्रकरणी पोलिसांच्या तपासात पुन्हा नवा ट्विस्ट समोर आला आहे.

Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
गुरुग्राममधील टेनिसपटू राधिका यादवच्या हत्येप्रकरणी पोलिसांच्या तपासात पुन्हा नवा ट्विस्ट समोर आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राधिकाचे वडील दीपक यादव यांनी स्वतःच्या मुलीवर गोळी झाडली होती, तसेच घटनेपूर्वी त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. दीपक काही दिवसांपूर्वी त्यांच्या गावी वजीरबादला गेले होते, जिथे गावकऱ्यांनी त्यांना टोमणे मारले.
लोक दीपकला म्हणाले की, ते त्यांच्या मुलीच्या कमाईवर जगतात आणि राधिकावर त्यांचं नियंत्रण नाही. या गोष्टीने दीपक नाराज झाले. गावातून परतल्यानंतर दीपक यांनी राधिकाशी अनेक वेळा बोलून तिला टेनिस अकॅडमी बंद करण्यास सांगितलं. राधिकाने हे नाकारलं आणि म्हणाली की, या अकॅडमीमध्ये दोन कोटी रुपये गुंतवले आहेत, त्यामुळे ती अशा प्रकारे बंद करता येणार नाही.
"इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
राधिका यादवला सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर बनायचं होतं. तिने एका म्युझिक व्हिडिओमध्येही काम केलं होतं आणि एल्विश यादव सारख्या कंटेंट क्रिएटर्सकडून तिला प्रेरणा मिळाली होती. दीपक या गोष्टींमुळे तीन दिवस मानसिकदृष्ट्या खूप अस्वस्थ होते आणि आत्महत्येचा विचारही करू लागले. घटनेच्या दिवशी त्यांनी पुन्हा एकदा राधिकाशी या विषयावर चर्चा केली. त्यानंतर काही वेळातच, राधिका स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असताना, तिच्यावर मागून गोळ्या झाडल्या.
राधिकाच्या करियरवर अडीच कोटींचा खर्च, अकाऊंट डिलीट; वडिलांच्या थ्येरीवर पोलिसांना संशय
पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, राधिकाच्या छातीत चार गोळ्या लागल्या आणि तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेच्या वेळी राधिकाची आई मंजू यादव देखील घरात उपस्थित होती, परंतु त्यांनी सांगितल की त्या ताप आल्यामुळे खोलीत झोपल्या होत्या आणि पतीने इतकं मोठं पाऊल का उचललं हे माहित नाही. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि आरोपी वडिलांची चौकशी केली जात आहे.