इंदूरच्या सोनमपेक्षाही नीतू निघाली खतरनाक! प्रियकरासोबत मिळून पतीचा काटा काढला अन्…

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 14:14 IST2026-02-21T14:00:29+5:302026-02-21T14:14:43+5:30

आपल्या अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची सुपारी देऊन हत्या घडवून आणली.

Neetu turned out to be more dangerous than Sonam of Indore! She killed her husband with her lover and… | इंदूरच्या सोनमपेक्षाही नीतू निघाली खतरनाक! प्रियकरासोबत मिळून पतीचा काटा काढला अन्…

AI Generated Image

प्रेम आंधळं असतं असं म्हणतात, पण रांचीमध्ये याच प्रेमासाठी एका पत्नीने क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. आपल्या अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची सुपारी देऊन हत्या घडवून आणली. विजय लोहरा असे मृत पतीचे नाव असून, पोलिसांनी या प्रकरणी पत्नी नीतू देवीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेने संपूर्ण झारखंडमध्ये खळबळ माजली आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

अवैध संबंधांच्या विरोधातून रचला कट

मृत विजय लोहरा हा रांचीच्या हुसीर गावचा रहिवासी होता. विजयची पत्नी नीतू हिचे एका तरुणासोबत गेल्या अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. जेव्हा विजयला या प्रकरणाची कुणकुण लागली, तेव्हा घरामध्ये वादाला सुरुवात झाली. विजयने या संबंधांना कडाडून विरोध केला. आपल्या प्रेमाच्या मार्गातील हा काटा कायमचा दूर करण्यासाठी नीतूने तिच्या प्रियकरासह मिळून पतीला संपवण्याची भयंकर योजना आखली.

अपहरण करून गेम वाजवला!

१० फेब्रुवारी रोजी ठरलेल्या प्लॅननुसार, विजयचे कारमधून अपहरण करण्यात आले. यानंतर भाडोत्री मारेकऱ्यांच्या मदतीने विजयची हत्या करण्यात आली. पुराव्यांची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींनी त्याचा मृतदेह अनगडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिंग रोडच्या सर्व्हिस रस्त्यावर एका निर्जनस्थळी फेकून दिला. मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाची चक्रे फिरवली आणि पत्नीच्या मोबाईल कॉल्सवरून या गुन्ह्याचे धागेदोरे नीतूपर्यंत पोहोचले.

शूटर आणि प्रियकराचा शोध सुरू

पोलिसांनी नीतू देवीला अटक केली असून तिने आपला गुन्हा कबूल केला आहे. मात्र, या हत्येसाठी तिने किती रुपयांची सुपारी दिली होती आणि त्यात आणखी कोणाकोणाचा सहभाग होता, याचा उलगडा होणे अद्याप बाकी आहे. सध्या तिचा प्रियकर आणि प्रत्यक्ष हत्या करणारे शूटर फरार असून पोलीस त्यांच्या अटकेसाठी ठिकठिकाणी छापेमारी करत आहेत.

Web Title: Neetu turned out to be more dangerous than Sonam of Indore! She killed her husband with her lover and…