राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना केली धक्काबुक्की; दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 15:39 IST2019-04-19T15:36:20+5:302019-04-19T15:39:00+5:30
या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस स्थानकात शरद गवळी, निवेदन पुष्पराजन यांच्यासह अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना केली धक्काबुक्की; दोघांना अटक
ठळक मुद्देपोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुकी, शिविगाळ, मारहाण करत धमकी दिल्याची घटना आज दुपारी घडली. शरद गवळी हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष आहे.
कल्याण - पोलीस अधिकाऱ्याने दंड भरण्यास सांगितल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने आपल्या साथीदारासह पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुकी, शिविगाळ, मारहाण करत धमकी दिल्याची घटना आज दुपारी घडली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस स्थानकात शरद गवळी, निवेदन पुष्पराजन यांच्यासह अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी गवळी, पुष्पराजन यांना बेड्या ठोकल्या आहेत. शरद गवळी हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा कल्याणडोंबिवली जिल्हाध्यक्ष आहे.
कल्याण - दुपारी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना केली धक्काबुक्की; दोघांना अटक
— Lokmat (@MiLOKMAT) April 19, 2019