राष्ट्रवादीचे नेते आनंदराव पाटील यांचा निर्घृण खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 03:38 IST2020-02-03T03:38:07+5:302020-02-03T03:38:41+5:30

सांगली : खटाव (ता. पलूस) येथील राष्ट्रवादीचे नेते, माजी सरपंच आनंदराव पाटील (५३) यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी रविवारी सकाळी ...

NCP leader Anandrao Patil's brutal murder | राष्ट्रवादीचे नेते आनंदराव पाटील यांचा निर्घृण खून

राष्ट्रवादीचे नेते आनंदराव पाटील यांचा निर्घृण खून

सांगली : खटाव (ता. पलूस) येथील राष्ट्रवादीचे नेते, माजी सरपंच आनंदराव पाटील (५३) यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हल्ला करून त्यांचा खून केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहायक गजानन पाटील यांचे ते बंधू होते. शेतातून परतत असताना पाटील यांच्यावर सत्तुराने हल्ला झाला. डोक्यावर, हातावर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याने व डोक्यातील वार वर्मी बसल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हल्लेखोर मोटारसायकलवरून पसार झाले. त्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथकही आणले होते.

Web Title: NCP leader Anandrao Patil's brutal murder