UP : Muzaffarnagar women suicide video goes viral allegation on family police | धक्कादायक! बंद खोलीत सूनेने गळफास घेऊन केली आत्महत्या, सासरचे लोक बाहेरून काढत राहिले व्हिडीओ!

धक्कादायक! बंद खोलीत सूनेने गळफास घेऊन केली आत्महत्या, सासरचे लोक बाहेरून काढत राहिले व्हिडीओ!

उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरपूरमध्ये एका विवाहित महिलेने बंद खोलीत पंख्याला लटकून आत्महत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे ती आत्महत्या करत असताना तिच्या सासरचे लोक तिला वाचवण्याऐवजी खोलीच्या बाहेरून तिचा आत्महत्येचा व्हिडीओ काढत होते. इतकेच नाही तर त्यांनी तिच्या आत्महत्येचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. 

घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेहाचा पंचानामा करून पोस्टमार्टमसाठी पाठवला. दुसरीकडे मृत महिलेच्या नातेवाईकांनी तिच्या सासरच्या लोकांवर गंभीर आरोप लावले आहेत. त्यांनी सासरच्या लोकांवर हुंडा आणि हत्येचा आरोप लावत तशी लिखित तक्रार पोलिसात दिली आहे. पोलिसांनी त्यानुसार गुन्हा दाखल करून घेतला आणि त्या लोकांना अटकही केली. (हे पण वाचा : महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; आईच्या मृतदेहासोबत खेळत होती जुळी मुलं, भावूक करणारा क्षण)

ही घटना मुजफ्फरनगरच्या दतियाना गावातील आहे. इथे कोमल नावाच्या विवाहित महिलेने आत्महत्या केली. असे सांगितले जात आहे की, मृत महिला पलडी गावात राहणारी होती. कोमलचं लग्न दोन वर्षापूर्वी आशिषसोबत झालं होतं. कोमलच्या परिवाराने आरोप लावला की, लग्न झाल्यापासूनच तिच्या सासरचे लोक तिच्याकडे हुंड्याची मागणी करत होते. त्यावरून तिला मारहाणही करत होते. त्यामुळे त्रासाला कंटाळून कोमलने आत्महत्या केली.

इतकेच नाही तर घटनेवेळी सासरच्या लोकांनी खोलीच्या बाहेरून विवाहितेच्या आत्महत्येचा व्हिडीओ तयार केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर तिच्या सासरच्या लोकांची तक्रार दिली गेली आणि त्यांना अटक करण्यात आली. 
 

Web Title: UP : Muzaffarnagar women suicide video goes viral allegation on family police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.