आजारी पत्नीला सांभाळणे कठीण झाल्याने तिची गळा चिरून केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 04:22 PM2019-08-02T16:22:12+5:302019-08-02T16:24:57+5:30

पत्नीची देखभाल करणे शक्य झाले नसल्यामुळे चाकूने गळा चिरुन खून करत असल्याचे म्हटले आहे....

A murdered wife slit her throat because difficult to handle due to illness | आजारी पत्नीला सांभाळणे कठीण झाल्याने तिची गळा चिरून केली हत्या

आजारी पत्नीला सांभाळणे कठीण झाल्याने तिची गळा चिरून केली हत्या

googlenewsNext

पुणे : पत्नीच्या आजारपणाला कंटाळुन तिला सांभाळणे त्रासदायक झालेल्या नव-याने तिला गळा चिरुन ठार मारल्याची घटना वानवडी येथे घडली. पत्नीची हत्या करुन नवऱ्याने आत्महत्या करण्यास जात आहे. अशा आशयाची  चिठ्ठी लिहून तो पसार झाला आहे. घटनेतील नवऱ्याचे वय ७८ असून पत्नीचे वय ६६ आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.  


देविंदर कौर बिंद्रा (६६ रा.फ्लॉवर व्हॅली, लोटस बिल्डींग सोसायटी, वानवडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी हरविंदर सिंग बिंद्रा (७८) याच्यावर वानवडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.  पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वानवडी बाजार चौकी येथील फ्लॉवर व्हँली लोटस इमारतीमध्ये एक ६६ वर्षे वयाची महिला जखमी अवस्थेत आढळल्याची महिला पोलिसांना मिळाली. याप्रकरणी त्यांचा मुलगा रमेंद्रसिंग बिंद्रा यांच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की, वडिल हरविंदर यांना आईची काळजी घेणे शक्य नसल्याने  त्यांनी चाकुने तिचा गळा चिरुन खुन केला.  त्यांनी खून केल्यानंतर जवळ एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. यामध्ये पत्नीची देखभाल करणे शक्य झाले नसल्यामुळे चाकूने गळा चिरुन खून करत असल्याचे म्हटले आहे. तसेच मी स्वत: हा खून केला असून इतर कोणालाही जबाबदार धरु नये. यानंतर मी सुध्दा आत्महत्या करणार  असल्याचे लिहले आहे. याविषयी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यात आपण आपल्या पत्नीला सांभाळु शकत नसून ती सतत आजारी असल्याने तिला मारल्याचे व  त्यानंतर स्वत: देखील आत्महत्या करणार आहे. असे त्याने म्हटले आहे. पोलिसांनी तातडीने एक पथक तयार करुन हरविंदर यांचा शोध घेण्यास सुरवात केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी दिली.

Web Title: A murdered wife slit her throat because difficult to handle due to illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.