शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात गोळीबार करून तरुणाचा खून, कोयत्यानेही केले निर्घुण वार   

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 10:41 IST

पूर्ववैमनस्यावरुन तिघा जणांनी तरुणावर गोळीबार करून त्यानंतर कोयत्याने वार करुन एका तरुणाचा निर्घुण खुन केल्याची घटना शाहू वसाहतीत घडली.

पुणे - पूर्ववैमनस्यावरुन तिघा जणांनी तरुणावर गोळीबार करून त्यानंतर कोयत्याने वार करुन एका तरुणाचा निर्घुण खुन केल्याची घटना शाहू वसाहतीत घडली. अमित मिलिंद सरोदे (वय २१, रा. गल्ली नंबर २५, जनता वसाहत, पर्वती) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सौरभ महेश मोहोळ (वय २१, रा. शाहु वसाहत, लक्ष्मीनगर, पर्वती) यांनी दत्तवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.  या फिर्यादीवरुन पोलिसांनी आदर्श ननावरे, बोंबल्या आणि यशवंत कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या तिघांपैकी ननावरे आणि बोंबल्या हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ मोहोळ आणि अमित सरोदे हे दोघे मित्र होते. सौरभ मोहोळ आणि अमित सरोदे हे शाहु वसाहतीतील बालाजी होलसेल येथे रविवारी रात्री पावणे अकरा वाजता उभे होते. शहरात रात्री १० नंतर संचारबंदी असली तरी लोक ती पाळताना दिसत नाही. दोघेही रात्री उशिरा तेथे थांबलेले असताना आदर्श ननावरे, बोंबल्या व यशवंत कांबळे तेथे आले. ननावरे याने आपल्याकडील पिस्तुल काढून अमित सरोदे याच्यावर गोळी झाडली. त्यानंतर यशवंत कांबळे याच्या सांगण्यावरुन बोंबल्या व ननावरे यांनी त्यांच्याकडील कोयत्याने अमितच्या मानेवर, डोक्यावर सपासप वार करुन त्याचा निर्घुण खुन केला. त्यानंतर तिघे पळून गेले. याची माहिती मिळाल्यावर दत्तवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अमितला रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यु झाला होता़ दत्तवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनPuneपुणे