जुन्या रागातून काेयत्याने वार करुन युवकाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2018 13:46 IST2018-09-02T13:44:00+5:302018-09-02T13:46:12+5:30

जुन्या भांडणाच्या रागातून सहाजणांनी एकावर काेयत्याने वार करुन त्याचा खून केला.

murder of young guy at kamshet | जुन्या रागातून काेयत्याने वार करुन युवकाचा खून

जुन्या रागातून काेयत्याने वार करुन युवकाचा खून

कामशेत : जुन्या भांडणाच्या रागातून एकाचा अाज पाहाटे काशेत येथील ताजे गावाजवळ खून करण्यात अाला. किरण बाळू काेरडे (वय 25, रा. सज्जनवाडी, जाते) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव अाहे.


    याप्रकरणी साेमनाथ बाळू काेरडे यांनी कामशेत पाेलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली अाहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किरण हा पिंपरी येथील एका कॉफी शॉप मध्ये कामास होता. तो रविवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास कामावरून घरी येत हाेता. त्यावेळी कामशेत जवळील ताजे गावच्या हद्दीत काशिनाथ केदारी यांच्या घराच्या समोरील रस्त्यावर आरोपी नितीन ज्ञानेश्वर केदारी, बाळू शंकर केदारी, नितीन अर्जुन केदारी, बबन विठ्ठल केदारी, उमेश चंद्रकांत केदारी (सर्व. रा. ताजे, मावळ ) व काळू बाळू पिंपळे ( रा. पिंपळोली, मावळ ) यांनी किरण कोरडे याची दुचाकी अडवून त्याच्या तोंडावर, डोक्यावर हातावर कोयत्याने वार करून जीवे ठार मारले. घटना घडते वेळी काेरडेचा चुलत भाऊ अमोल कोरडे याने साेमनाथ याला कळवले. घटनेची माहिती कळताच सोमनाथ कोरडे घटनास्थळी स्थळी पोहचला व जखमी किरण कोरडे यास उपचारासाठी सोमाटणे येथील खाजगी रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.   

    या प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केले असून उर्वरित आरोपी फरार आहेत. पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक नीलकंठ जगताप करत अाहेत.

Web Title: murder of young guy at kamshet