पुण्यातील धनकवडीत भाजी विक्रेत्याबरोबरील भांडणातून एकाचा खुन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 15:19 IST2019-06-22T15:17:02+5:302019-06-22T15:19:59+5:30
रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या भाजी विक्रेत्याबरोबर प्लास्टिक पिशवी देण्यावरुन झालेल्या वादातून खुन करण्याचा प्रकार धनकवडीत घडला़.

पुण्यातील धनकवडीत भाजी विक्रेत्याबरोबरील भांडणातून एकाचा खुन
पुणे : रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या भाजी विक्रेत्याबरोबर प्लास्टिक पिशवी देण्यावरुन झालेल्या वादातून चाकूने वार करुन खुन करण्याचा प्रकार धनकवडीत घडला़.
रामदास शामराव शिळीमकर (वय ३८, रा़ धनकवडी) असे खुन झालेल्याचे नाव आहे़. ही घटना धनकवडी येथील शेवटचा बसस्टॉपजवळील योगी सोसायटीसमोरील रोडवर शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला़. याप्रकरणी विकास चव्हाण (वय. ४४, रा़. चव्हाणवाडा, धनकवडी, गावठाण) यांनी फिर्याद दिली आहे़. सहकारनगर पोलिसांनी ज्ञानेश्वर वानखेडे व त्याचा भाऊ आणि मेव्हण्यावर गुन्हा दाखल केला आहे़.
अनेक वर्षे ओळख असताना इतक्या छोट्या कारणावरुन त्यांनी खुन केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे़. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी सांगितले की, गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहे़. ज्ञानेश्वर वानखेडे याला पकडल्यानंतरच खुनामागील नेमके कारण समजू शकणार आहेत़.