शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
5
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
6
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
7
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
8
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
9
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
10
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
11
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
12
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
13
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
14
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
17
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
18
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
19
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
20
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षिकेच्या हत्येप्रकरणात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 20:38 IST

आरोपीच्या शोधार्थ पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे.

ठळक मुद्देसोमवारी सकाळी १० वाजताच्या तब्बल चार दिवसांनंतर धामणी येथे मृताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. परतवाडा-चिखलदरा मार्गावरील धामणगाव गढीनजीक अचलपूर तालुक्यातील धामणी हे आदिवासी खेडे आहे.

परतवाडा (अमरावती) - अचलपूर तालुक्यातील धामणी येथील शिक्षिका शारदा बेलसरे यांच्या हत्या प्रकरणात हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. दरम्यान सोमवारी सकाळी १० वाजताच्या तब्बल चार दिवसांनंतर धामणी येथे मृताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आरोपीच्या शोधार्थ पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे.

परतवाडा-चिखलदरा मार्गावरील धामणगाव गढीनजीक अचलपूर तालुक्यातील धामणी हे आदिवासी खेडे आहे. येथील शारदा मांगीलाल बेलसरे (२७) या उच्चशिक्षित युवतीचा मृतदेह हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातील हत्ता येथील साठवण तलावात शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान आढळून आला होता. शनिवारी अज्ञात मृतदेहाची ओळख पटल्यानंतर रविवारी या प्रकरणात मृताचा  भाऊ संदीप बेलसरे यांनी सेनगाव पोलिसात तक्रार दिल्यानंतर अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रेमप्रकरणातून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज असून हत्या करणारा कोण, त्याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. शारदा बेलसरे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन हिंगोली जिल्हा रुग्णालयात करण्यात आले होते. त्यामध्ये गळा आवळून तिची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे.तपासणीसाठी विशेष पथकशारदा बेलसरे या शिक्षिकेच्या हत्येचा तपास सेनगाव येथील पोलीस उपनिरीक्षक बाबुराव जाधव यांच्यासह सहकारी कर्मचारी करीत आहे. तर हिंगोली येथील जिल्हा  गुन्हे अन्वेषण विभागाच्या सहकार्याने  त्यांनी आरोपींची शोध मोहीम चालवली आहे. मृताचा मोबाईल बेपत्ता असून तिने शेवटचा संवाद कुणाशी साधला, ती कुणाच्या संपर्कात होती? आदी सर्व बाबींचा खुलासा लवकरच होणार आहे. तर विलास पानसे हा युवक कोण? तो कोठे राहतो, याचीही चौकशी पोलिसांनी आरंभली आहे. 

शारदा बेलसरे यांच्या मृत्यू प्रकरणात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे अन्वेषण विभागाच्या सहकार्याने तपास आरंभला आहे. चौकशीसाठी लवकरच एक पथक अमरावती जिल्ह्यात पाठविण्यात येईल. - बाबुराव जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सेनगाव 

टॅग्स :MurderखूनAmravatiअमरावतीPoliceपोलिसTeacherशिक्षक