घरगुती वादातून पत्नीच्या डोक्यात तवा मारून केला खून; मांजरीतील धक्कादायक घटना 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 06:12 PM2020-11-26T18:12:50+5:302020-11-26T18:14:43+5:30

कला आणि त्यांचा पती दोघेही मांजरी -केशवनगर रोडवर भाड्याच्या घरात राहात होते.

Murder by stabbing wife in the head over a domestic dispute; Shocking events in Manjri | घरगुती वादातून पत्नीच्या डोक्यात तवा मारून केला खून; मांजरीतील धक्कादायक घटना 

घरगुती वादातून पत्नीच्या डोक्यात तवा मारून केला खून; मांजरीतील धक्कादायक घटना 

Next

हडपसर : घरघुती वादातून पत्नीच्या डोक्यात तवा मारून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना मांजरी भागात घडली आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पतीला ताब्यात घेण्यात आले आहे. कला आदिनारायण यादव (वय 30, रा. मांजरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कला आणि त्यांचा पती दोघेही मांजरी -केशवनगर रोडवर भाड्याच्या घरात राहात होते. मोलमजुरी करून ते आपली गुजराण करत होते. दरम्यान, त्यांच्यात घरगुुती कारणावरून वाद होते. आज सकाळीदेखील त्यांच्यात वाद झाला. या वादातून रागाच्या भरात आदिनारायण याने पत्नी कला यांच्या डोक्यात चुलीवरचा तवा मारून त्यांचा खून केला. दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर तो घरातच थांबला होता. शेजाऱ्यांनी हा प्रकार पाहिल्यानंतर हडपसर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पतीला ताब्यात घेतले आहे.

Web Title: Murder by stabbing wife in the head over a domestic dispute; Shocking events in Manjri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.