कोल्हापूरमधील तारदाळात पानपट्टी चालकाचा खून, दोघे ताब्यात; एक फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 11:20 AM2021-10-24T11:20:43+5:302021-10-24T11:21:02+5:30

Crime News: तारदाळ (ता हातकणंगले) येथील प्राईड इंडिया टेक्स्टाईल पार्क लगत असलेल्या सांगले मळ्यात, शेतामध्ये रेकॉर्ड वरील एका गुन्हेगाराचा धारदार शास्त्राने वार करून खून करण्यात आला आहे. सं

Murder of Panpatti driver in Kolhapur, two arrested; A fugitive | कोल्हापूरमधील तारदाळात पानपट्टी चालकाचा खून, दोघे ताब्यात; एक फरार

कोल्हापूरमधील तारदाळात पानपट्टी चालकाचा खून, दोघे ताब्यात; एक फरार

Next

- अतुल आंबी 
इचलकरंजी - तारदाळ (ता हातकणंगले) येथील प्राईड इंडिया टेक्स्टाईल पार्क लगत असलेल्या सांगले मळ्यात, शेतामध्ये रेकॉर्ड वरील एका गुन्हेगाराचा धारदार शास्त्राने वार करून खून करण्यात आला आहे. संदीप घट्टे ( रा धनगरमाळ , कोरोची ता. हातकणंगले ) असे त्याचे नाव आहे. तो पानपट्टी चालक होता. ही घटना रविवारी पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर एकजण फरार आहे.
            गणेश घोडके , सागर आमले दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून गणेश वाझे हा फरार आहे. तिघेही (रा कोरोची). संदीप घट्टे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो या पूर्वी एका ट्रान्सपोर्ट मध्ये हमालीचे काम करत होता. काही महिन्यांपासून तो पानपट्टी चालू करून तेथे मटका घेत असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. दरम्यान , रात्रीच्या सुमारास संदीप याचा अज्ञातांनी डोक्यात वार करून डोक्याचा चेंदामेंदा केला. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड , पोलीस उपअधीक्षक बाबुराव महामुनी , पोलीस निरीक्षक श्रीप्रसाद यादव यांनी भेट दिली.

Web Title: Murder of Panpatti driver in Kolhapur, two arrested; A fugitive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app