डोक्यात लोखंडी रॉड टाकून तरुणाचा खून, संशयिताला पहाटे अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 17:57 IST2022-02-13T17:57:16+5:302022-02-13T17:57:56+5:30
Murder Case : याप्रकरणी रविवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयिताला अटक करण्यात आली आहे. अरुण संतोष तिरमले (रा. गोविंदनगर, दोंडाईचा) असे मयताचे नाव आहे.

डोक्यात लोखंडी रॉड टाकून तरुणाचा खून, संशयिताला पहाटे अटक
धुळे : पत्नीला अश्लील शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. संतापाच्या भरात डोक्यात लोखंडी रॉड आणि काेयत्याने वार केल्याने २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना दोंडाईचा येथील तिरमले वाड्यातील एकलव्य बोर्डाजवळ शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रविवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयिताला अटक करण्यात आली आहे. अरुण संतोष तिरमले (रा. गोविंदनगर, दोंडाईचा) असे मयताचे नाव आहे.
थरकाप उडवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून तरुणीची भरदिवसा तिच्या घराबाहेर गळा चिरून हत्या