दुचाकीचा कट लागल्यावरून तरुणाचा खून; 5 संशयित ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 11:47 IST2022-01-31T11:46:38+5:302022-01-31T11:47:15+5:30

शहरातील पुनगाव रोडवरील बुऱ्हाणी शाळेसमोर रविवारी संध्याकाळी तरुणांच्या  दोन गटात दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून हाणामारी झाली.

Murder of a young man after being hit by a two-wheeler; 5 suspects in custody in jalgaon | दुचाकीचा कट लागल्यावरून तरुणाचा खून; 5 संशयित ताब्यात

दुचाकीचा कट लागल्यावरून तरुणाचा खून; 5 संशयित ताब्यात

पाचोरा जि. जळगाव : दुचाकीला कट लागल्याच्या कारणावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यात तरुणाचा भोसकून करण्यात आला. ही घटना  पाचोरा येथे रविवारी सायंकाळी सात वाजता घडली. यात पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. भूषण नाना शेवरे (२३,रा. दुर्गा नगर, पाचोरा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

शहरातील पुनगाव रोडवरील बुऱ्हाणी शाळेसमोर रविवारी संध्याकाळी तरुणांच्या  दोन गटात दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून हाणामारी झाली. यात  लाठ्या काठ्या, चॉपर, फायटरचा वापर झाला. भूषण शेवरे याच्यावर चॉपरने वार करण्यात आले. यात तो गंभीर जखमी झाला. जळगावच्या जिल्हा रुग्णालयात रात्री त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सनी रवींद्र देवकर (रा.गाडगेबाबा नगर, पाचोरा) याच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात सोमवारी पहाटे ३ वाजता खुनाचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी तात्काळ पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.
 

Web Title: Murder of a young man after being hit by a two-wheeler; 5 suspects in custody in jalgaon