कोथरूडमध्ये अल्पवयीन विशेष मुलाचा खून; परिसरात खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 00:47 IST2022-03-25T00:46:39+5:302022-03-25T00:47:32+5:30

या घटनेची माहिती मिळताच कोथरुड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर, मृतदेह शव विच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

Murder of a minor special child in Kothrud at pune one arrested | कोथरूडमध्ये अल्पवयीन विशेष मुलाचा खून; परिसरात खळबळ 

सांकेतिक छायाचित्र

पुणे- कोथरुडमधील एकलव्य पॉलिटेक्निक कॉलेज मैदानाजवळ एका १३ वर्षीच्या मुलाचा खून करून मृतदेह पोत्यात बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी रात्री उशिरा उघडकीस आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. करण गोपाळ राठोड (वय १३, रा. म्हातोबानगर, कोथरुड) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.

या घटनेची माहिती मिळताच कोथरुड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर, मृतदेह शव विच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, एकलव्य कॉलेज मैदानाजवळ रात्रीच्या वेळेस लहान मुले खेळत होती. त्यांना पोत्यात काहीतरी बांधून ठेवलेले आढळून आले. पोते उघउून पाहिल्यावर त्यांना त्यात मृतदेह आढळून आला. त्यांनी आसपासच्या लोकांना सांगितले. तेथून ती बातमी पोलिसांना मिळाली. मृत मुलगा विशेष असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याचे आई वडील मजुरी करतात. मुलाच्या अंगावर एकही कपडा नव्हता. यामुळे अनेक शंकाकुशंका व्यक्त केल्या जात आहे. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

Web Title: Murder of a minor special child in Kothrud at pune one arrested