शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
3
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
4
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
5
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
6
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
7
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
8
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
9
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
10
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
11
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
12
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
13
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
14
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
15
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
16
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
17
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
18
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
19
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
20
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

अल्पवयीन मुलीच्या खूनाचे गूढ उकलले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 1:09 PM

बारामती शहरातील सांस्कृतिक भवनसमोर झालेल्या अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणाचे गूढ उकलण्यात शहर पोलिसांना यश आले आहे.

ठळक मुद्देमटका व्यावसायिक कृष्णा जाधवची हत्या केल्याच्या रागातून केला खूनडोक्यासह  मानेवर, हातावर, चेहऱ्यावर धारदार लोखंडी कोयत्याने वार

बारामती : सोमवारी (दि. १७) बारामती शहरातील सांस्कृतिक भवनसमोर झालेल्या अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणाचे गूढ उकलण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये मटका व्यावसायिक कृष्णा जाधव याचा खून केल्याच्या रागातून अल्पवयीन मुलीचा खून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी दोघा अल्पवयीन मुलांसह तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार : सोमवारी (दि. १७) रात्री ८.३० च्या सुमारास शहरातील  सांस्कृतिक केंद्रासमोरील रस्त्यावर वैष्णवी ऊर्फ चिमी अशोक जाधव (वय १७, रा. कैकाड गल्ली, बारामती नेवसरोड, बारामती, जि. पुणे) ला मागील भांडणाच्या कारणावरून अल्पवयीन आरोपीने तिला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने तिच्या डोक्यासह  मानेवर, हातावर, चेहऱ्यावर धारदार लोखंडी कोयत्याने वार केले. याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.  वैष्णवीला गंभीर जखम होती, म्हणून तिला पुढील औषधोपचारासाठी ससून रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले होते. तिच्यावर उपचार सुरू असताना मंगळवारी (दि. १८) रात्री ८ वाजता तिचा मृत्यू झाला. त्यानुसार दाखल गुन्हयास भा. दं. वि. क. ३०२ हे कलम लावण्यात आलेले आहे. गुन्हयाच्या तपासात यातील वार करणाºया अल्पवयीन मुलाने  पूर्वी नाना ऊर्फ कृष्णा महादेव जाधव याचा खून केल्याच्या कारणावरून वैष्णवीला मारण्यासाठी   त्याचा साथीदार ओंकार शिवाजी जाधव (वय १९) याने आणखी एका अल्पवयीन साथीदारासह दुचाकीवरून (एमएच४२/एएल -८) वैष्णवीचा पाठलाग सुरू केला. यावेळी त्यांनी सॅकमध्ये दोन कोयते व सुरा बरोबर घेतला. त्यानंतर तिघे वैष्णवी हिच्या दुचाकीचा पाठलाग करीत बारामती येथील वसंतराव पवार नाट्यगृह सांस्कृतिक भवनासमोर आले. त्यावेळी वैष्णवी बसलेल्या दुचाकीला पहिल्या अल्पवयीन आरोपीने जोरात लाथ मारली. वैष्णवीला खाली पाडले. यावेळी त्या अल्पवयीन आरोपीला ओंकार शिवाजी जाधव याने त्याच्याजवळील असलेल्या सॅकमधून लोखंडी कोयता काढून दिला. त्या कोयत्याने अल्पवयीन आरोपीने वैष्णवी हिच्या डोक्यात, मानेवर, हातावर, चेहºयावर २८ वार केले. त्यादरम्यान सॅकमधील आणखी एक लोखंडी कोयता व सुरा अशी हत्यारे घेऊन ओंकार जाधव दुसºया अल्पवयीन आरोपीसह पळून गेला. ती हत्यारासह सॅक ओंकार जाधव याने नीरा डाव्या कालव्यामध्ये टाकून दिलेली असल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे.............

आरोपीला अटक : पाच दिवसांची कोठडीया गुन्हयातील आरोपी ओंकार जाधव (वय १८) याचा या गुन्हयात सहभाग दिसून आलेला आहे. त्याला गुरुवारी रात्री साडेदहाच्यादरम्यान अटक करण्यात आलेली आहे. त्यास शुक्रवारी (दि. २१) न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यास ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्हयाचा तपास पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांचे सूक्ष्म मार्गदर्शन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी महत्त्वाचे ठरल्याचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीMurderखूनPoliceपोलिसArrestअटक