शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याची हत्या; गळा चिरून घेऊन गेले हल्लेखोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 13:55 IST2021-12-01T13:55:00+5:302021-12-01T13:55:46+5:30
Murder Case : हे प्रकरण मध्य प्रदेशातील जबलपूरचे आहे. येथील तिलवाडा पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या परसिया गावात अज्ञात हल्लेखोरांनी ६० वर्षीय शेतकरी गया प्रसाद यांची गळा चिरून हत्या केली. ही बाब सोमवारी दुपारची आहे.

शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याची हत्या; गळा चिरून घेऊन गेले हल्लेखोर
मध्य प्रदेशात अज्ञात हल्लेखोरांनी शेतकऱ्याची हत्या केली. एवढेच नाही तर मारेकरी शेतकऱ्याचा गळा चिरून घेऊन गेले. हत्या झाली तेव्हा शेतकरी आपल्या शेतात काम करत होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
हे प्रकरण मध्य प्रदेशातील जबलपूरचे आहे. येथील तिलवाडा पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या परसिया गावात अज्ञात हल्लेखोरांनी ६० वर्षीय शेतकरी गया प्रसाद यांची गळा चिरून हत्या केली. ही बाब सोमवारी दुपारची आहे.
मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला
दुपारी ३ वाजता पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. तिलवाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी राहुल सैयान यांनी सांगितले की, काही अज्ञात हल्लेखोरांनी शेतकऱ्याचा गळा चिरून पळवून नेले. तो शेतात काम करत होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे.