शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

धक्कादायक... दीड कोटीच्या विम्यासाठी मित्राला कारसह पेटविले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 4:09 AM

दीड कोटीच्या विम्यासाठी तरुणाने स्वत:च्या खुनाचा बनाव रचून आपल्या जीवलग मित्राला संपविल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे.

 कोरेगाव/वाठार स्टेशन (सातारा) - दीड कोटीच्या विम्यासाठी तसेच मुंबईतील व्यवसायात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी सुमित मोरे (३०, रा. महिमानगड, ता. माण) याने स्वत:च्या खुनाचा बनाव रचून आपला जीवलग मित्र तानाजी आवळे (२८) याला संपविल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. अवघ्या चार दिवसांत पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला.सुमित मोरे हा मुंबई येथे वास्तव्यास आहे. सोमवारी रात्री तो कारने मुंबईला निघाला होता. बोधेवाडी घाटात अज्ञाताने त्याचा खून करून कार त्याच्यासह पेटवून दिली. हा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. वाठार पोलिसांच्या तपासात मात्र धक्कादायक माहिती समोर येऊ लागली.

सुमित आई-वडिलांसह तो मुंबईतील सायन-कोळीवाडा येथे राहत होता. त्याने प्रोटीन पावडर विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. व्यवसायात त्याला नुकसान झाले. त्याचवर कर्जही झाले. कर्ज फेडण्यासाठी त्याने मुंबईतील आपल्या मित्राच्या साह्याने एका खासगी बँकेतून स्वत:चा दीड कोटी रुपयांचा विमा उतरविला होता. स्वत:चा अपघाती मृत्यू भासवायचा आणि विमा रक्कम घेऊन पळून जाण्याचा कट त्याने रचला होता. त्याने उर्किडे (ता. माण) येथील मित्र तानाजी आवळे याला लक्ष्य करण्याचे ठरविले. तानाजीची शरीर यष्टी हुबेहूब सुमितसारखीच होती. त्यामुळे त्याचा खून करून, तो सुमित मोरे आहे, असे त्याला भासवायचे होते. सुमितने तानाजी याला ‘आपल्याला बाहेरगावी जायचे आहे, दहिवडीमध्ये ये,’ असा निरोप दिला. तानाजीला घेऊन तो निघाला. कार बोधेवाडी घाटात पोहोचल्यानंतर त्याच्या डोक्यावर लाकडी स्टंम्पने वार केला, त्यात तानाजीचा जागीच मृत्यू झाला.मुलगा गेला तरी ...सुमितचे कुटुंबीय, त्यांचे नातेवाईक यांच्या चेहऱ्यावर पोलिसांना दु:ख दिसत नव्हते. सर्व जण तणावात असल्याचे दाखवत होते. मात्र त्यांची देहबोली वेगळीच होती. उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड यांच्या नजरेतून ही बाब सुटली नाही. भावाकडे चौकशी करण्यास सुरुवात केल्यावर तो गडबडला आणि पोलिसांपुढे सर्व हकीकत सांगितली. सुमित हा जेजुरी येथे असल्याचे त्याने सांगितले.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर