शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

कपड्याच्या बटनावरुन ४८ तासांत उकलले ट्रॅक्टरचालकाच्या खुनाचे गूढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 17:09 IST

घटनास्थळी पडलेल्या महिलेच्या कपड्याच्या बटनावरुन पोलिसांनी आरोंपींचा माग काढत त्यांना गजाआड केले आहे.

ठळक मुद्देघटनास्थळी पडलेल्या बटनावरुन पोलिसांनी काढला आरोंपींचा माग खुनप्रकरणी महिलेसह दोघांना अटक

बारामती :  बारामती शहरानजीक मेडद गावच्या हद्दीत झालेल्या ट्रॅक्टरचालकाच्या खुनाचे गुढ ४८ तासात उकलण्यात बारामती तालुका पोलिसांना यश आले आहे.घटनास्थळी पडलेल्या महिलेच्या कपड्याच्या बटनावरुन पोलिसांनी आरोंपींचा माग काढत त्यांना गजाआड केले आहे.अनैतिक संबंधातुन ट्रॅक्टरचालक वैभव सुनिल लोंढे (वय २२) याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी मंगल सुनील सुर्यवंशी (वय २९,रा.शारदानगर,माळेगांव,ता.बारामती),गणेश जगन्नाथ कोळी (वय ३१, रा माळेगाव) अशी अटक केलेल्ेया आरोपींची नावे आहेत.  पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव यांच्या पत्नी कोमल लोंढे यांनी याबाबत तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. ट्रॅक्टरचालक लोंढे हे  मेखळीतील बरकडवाडी येथे वास्तव्यास आहेत. बुधवारी (दि. २१) दुपारी २ वाजता मला वास्तुशांतीसाठी जायचे आहे, असे सांगून ते घराबाहेर पडले. बुधवारी रात्री आठच्या सुमारास पत्नीने त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता मला यायला उशीर होईल, असे त्यांनी सांगितले. रात्री नऊच्या दरम्यान फोन केला असता दुचाकी पंक्चर झाली असून मला उशीर होत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला.गुरुवारी (दि २२) दुपारी मेडद गावच्या हद्दीत लोंढे याचा मृतदेह सापडला. घटनेची माहिती समजल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक बी.बी.जाधव कर्मचाºयांसह तात्काळ घटनास्थळी रवाना झाले.  जाधव  यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता घटनास्थळी शर्टची बटणे, बांगडी/गोट, दुचाकी ( एमएच.४२ .एस.५५३५) ,दुचाकीची चावी पडलेली होती. दुचाकीच्या क्रमांकावरुन त्यात वैभव सुनिल लोंढे (रा.मेखळी ता.बारामती जि.पुणे )यांचा खुन झाल्याचे उघड झाले.घटनास्थळी मिळालेले काही तुटलेली बटणे व खुन करण्यासाठी फास दिलेली ओढणी देखील मिळाली. त्यानंतर पोलिसांनी मिळालेली बटने आणि ओढणीच्या अनुशंगाने कसुन तपास सुरु केला. ही बटणे कोणत्या प्रकारची आहेत .त्यासाठी गावामधील विविध प्रकारच्या दुकानदारांकडे चौकशी करण्यात आली. यामध्ये हे बटण महिलेचे असल्याचे निष्पन्न झाले. अशाप्रकारची बटने एका लेडीज टेलरकडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरुन कोणत्या महिलेच्या कपड्यांना ही  बटने वापरली होती,याबाबत पोलीसांना शोध  घेण्यात यश आले. तसेच यामधुन ट्रॅक्टरचालकाचा खून केलेल्या महिलेचे नाव निष्पन्न झाले. तपासामध्ये गुन्हयातील पुरूष व स्त्री या दोन्ही आरोपींनी गुन्हा कबुल केला आहे. हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे उघड झाले आहे.अधिक तपास पोलीस निरीक्षक  धन्यकुमार गोडसे  करीत आहेत.पोलीस अधिक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधिक्षक जयंत मिना उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली  पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे , पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब जाधव त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेशन चे सहायक पोलीस निरीक्षक गणेश क्षिरसागर आणि त्यांच्या सहकाºयांनी  गुन्हा उघडकीस आणला आहे.———————————————————— 

टॅग्स :BaramatiबारामतीMurderखूनArrestअटकPoliceपोलिस