बाथरुमधील खिडकीच्या काचेनं गळा, हाताची नस कापून घेतली; खुनाच्या आरोपीचा जेलमध्येच आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 15:56 IST2020-08-18T15:56:02+5:302020-08-18T15:56:41+5:30
याप्रकरणी माहिती मिळताच पोलिसांनी त्याला फूलपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

बाथरुमधील खिडकीच्या काचेनं गळा, हाताची नस कापून घेतली; खुनाच्या आरोपीचा जेलमध्येच आत्महत्येचा प्रयत्न
आजमगड जिल्ह्यातील दीदारगंज पोलिस स्टेशन परिसरातील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीस शनिवारी किशोरच्या खूनप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आणि पोलिस स्टेशनच्या बाथरूममध्ये काचेने गळा आणि हात कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी माहिती मिळताच पोलिसांनी त्याला फूलपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
नुकतीच दीदारगंज पोलिस स्टेशनमधील एका किशोरची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्या भावांसह चौघांना ताब्यात घेतले आहे. शनिवारी आरोपीने बाथरूममधील आरश्याची काचेने घश्यावर आणि हाताच्या नसावर वार करून पोलिस स्टेशनच्या बाथरूममध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला. रक्तबंबाळ अवस्थेत आरोपीला पाहून पोलिसांनी तातडीने त्याला फूलपूर ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिस अधीक्षक (ग्रामीण) सिद्धार्थ म्हणतात की, मृताच्या भावांसह चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यापैकी एका निराला नावाच्या बंधू बाथरूममधील काच काढून घशात आणि हाताला दुखापत केली आहे. त्याच्यावर फूलपूर येथे उपचार सुरू आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल
लज्जास्पद! चहा करण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीच्या गुप्तांगात टाकली मिरची पावडर
बॉलिवूड अभिनेत्यासह २३ जणांना अटक, कोरोना दहशतीखालीही गोव्यात रंगली रेव्ह पार्टी
पुणेरी टोळीचा कोपर खैरणेत हैदोस, पोलिसांनी पाठलाग करून पकडले आरोपी